Loan App: भारतात इन्संट लोन अॅप्सचे घोटाळे खूप वेगाने चालू आहे. इंस्टंट लोन अॅप्सला दररोज लोक बळी पडत आहेत. इंस्टंट लोन अॅपच्या जाळ्यात अडकून अनेक जण आत्महत्याही करत आहेत. या लोन अॅप्सच्या जाहिराती फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. सरकारने लोन अॅप्सबाबत अनेक कायदे केले आहेत पण एकही प्रभावी ठरत नाही. तुम्हाला इंस्टंट लोन अॅपच्या फसवणूकीपासून दूर राहायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवावे.
इन्स्टंट लोन अॅप्सवरून कर्ज घेणे धोकादायक
इन्संट लोन अॅप्सवरून कर्ज घेणे धोकादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे अॅप्स जास्त व्याज आकारतात. याशिवाय कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर शिवीगाळही करतात. याशिवाय हे लोक तुमचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकीही देतात.
अॅपवरून कर्ज घेताना कोणती काळजी घ्यावी
फक्त तेच अॅप डाउनलोड करा ज्यांना RBI ने मान्यता दिली आहे.
कोणत्याही अॅपवरून कर्ज घेण्यापूर्वी, त्याबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करावी.
अॅपचे बॅकग्राउंड त्याची हिस्ट्री इत्यादी तपासण्याची करावी.
KYC साठीचा डेटा कोणत्याही अज्ञात अॅपसोबत शेअर करू नका.
sachet.rbi.org.in वर भेट देऊन कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची तक्रार करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.