Budget -Friendly Wedding Reception: कमी बजेटमध्ये रिसेप्शन पार्टी द्यायचीय? मग वापरा या सोप्या ट्रिक्स

जर तुम्ही बजेटमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
Wedding Reception
Wedding ReceptionDainik Gomantak

Budget friendly wedding reception: लग्नसराई सुरू होताच अनेकजण लग्नाच्या तयारीला लागतात. लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अशावेळी लग्नाचे शेवटचे फंक्शन म्हणजेच लग्नाचे रिसेप्शन बजेटमध्येच करायला अनेक लोकांना आवडते. जर तुम्ही तुमच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जास्त पैसे खर्च करण्याचा विचार करत नसाल तर असे करू नका. कारण पुढील टिप्स वापरून तुम्ही पैशांची बचत करू शकता.

  • सजावटीवर कमी खर्च

लग्नाच्या रिसेप्शनसाठी सजावटीवर लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही साधी सजावट करून देखील पैशांची करू शकता. जेव्हा तुम्हाला सर्व कामे बजेटमध्ये करायची असतील, तेव्हा तुम्ही या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लग्नाचे रिसेप्शन क्रिएटिव केले तर पैशांची बचत होऊ शकते.

  • गेस्टची यादी करावी

अधिक लोकांना बोलावले की अधिक खर्च येतो. लग्नाच्या रिसेप्शनसाठी गेस्टची यादी तयार करावी. तुमच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी फक्त तुमच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करावे. यामुळे तुम्ही तुमचे पैसेही वाचवू शकता. 

  • इनविटेशन कार्ड बनवू नका

लग्नाच्या रिसेप्शनसाठी इनविटेशन कार्डवर खर्च करू नका. तुम्ही फोन किंवा मॅसेजद्वारे देखील इनविटेशन देऊ शकता.

  • मेन्यु सिंपल ठेवावा

लग्नाच्या रिसेप्शनसाठी जेवणावर भरपूर पैसा खर्च करू नका. यामुळे तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तुम्ही फक्त साधे पदार्थ आणि मेनू निवडू शकता. याद्वारे तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com