Vastu Tips: घरात कलह असेल तर हे करा उपाय

वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय केल्यास वास्तुदोष दुर होतो.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips: वास्तुशास्त्रात घरासाठी, करिअरसाठी अनेक उपाय सांगितले आहेत. जर तुमच्या घरात काही कारणांमुळे सतत कलहाचे वातावरण असेल तर वास्तुचे काही उपाय करुन कमी करु शकता. घरातले हे कलह अलक्ष्मीला आमंत्रण देतात. घरात सतत कोणीतरी आजारी असतं, काहीतरी दुखणी सुरूच असतात.

मग अशा वेळेला अनेकदा त्या घरात (Home) प्रवेशही करावेसे वाटत नाही. पण हा दोष कुटुंबातल्या सदस्यांचा नसून त्या वास्तूचा असु शकतो. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा वास्तुशास्त्राचे उपाय फॉलो करावे. मग घरात सतत कलह होत असल्यास वास्तुशास्त्राच्या कोणत्या पद्धती करून पाहाव्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • वास्तुशास्त्रात काय सांगितले आहे

घरातील (Home) खराब वास्तूमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होत असल्यास घराच्या आग्नेय कोपर्‍यात म्हणजेच आग्नेय दिशेला मोराची पिसे ठेवावे. यामुळे घरातील वास्तू दोष दूर होण्यास मदत होते.

घरातील कलह दूर करायचे असेल तर घरातील क्लेशाने त्रस्त असलेले लोक मोराच्या पिसांसंबंधी उपाय करू शकतात. यासाठी घराच्या मुख्य गेटवर मोराची पिसे लावा. असे मानले जाते की या उपायाने कौटुंबिक कलह दूर होतो आणि नकारात्मक शक्ती दुर होते.

Vastu Tips
Oily Food Tips: एक महिना करा तळलेल्या पदार्थांना बाय-बाय...शरीरात दिसतील 'हे' मोठे बदल
Peacock Feathers
Peacock Feathers Dainik Gomantak

शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी ज्यांना शत्रूंचा त्रास आहे, त्यांनी मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींच्या कपाळावर थोडेसे शेंदूर लावावे. हा शेंदूर मोराच्या पिसाने लावावा आणि उरलेला शेंदूर वाहत्या पाण्यात सोडून द्या. असे मानले जाते की यामुळे जीवनातील शत्रूंचा नाश होतो.

घरात नकारात्मक उर्जा राहिल्याने त्रास, समस्या, रोग इत्यादींचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी घराच्या ईशान्य कोपर्‍यात श्रीकृष्णाच्या चित्रासोबत मोराची पिसे लावावीत. यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्हमध्ये बदलेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com