Instagram अकाउंट प्रायव्हेट करायचे असेल तर जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

यासाठी तुम्हाला इंस्टाग्राममधील सेटिंग्ज बदलावी लागतील. या
Instagram
InstagramDainik Gomantak
Published on
Updated on

Instagram: सोशल मीडियाच्या जमान्यात लोक ऑनलाइन जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे लोक अधिकच चिंतेत आहेत. तुम्हाला इंस्टाग्रामवर अधिक कंट्रोल हवे असेल, ज्यामुळे सोशल मीडिया वापरण्याचा त्रास कमी होईल. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव, इंस्टाग्रामवर प्रायव्हेट ठेवले पाहिजे. यासाठी तुम्हाला इंस्टाग्राममधील सेटिंग्ज बदलावी लागतील. यानंतर तुम्ही तुमच्या कंटेट रेगुलेट करू शकता. तुमचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट करून तुम्ही तुमच्या पोस्ट आणि अॅक्टिव्हिटी नियंत्रित करण्यात कंट्रोल करू शकता.

  • स्मार्टफोनवर इंस्टाग्राम कसे कंट्रोल करावे

सर्वात पहिले इंस्टाग्राम अॅप ओपन करावे.

यानंतर प्रोफाइलवर जावे.

यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणार्‍या तीन लाइनवर टॅप करावे.

यानंतर सेटिंग हा पर्याय सिलेक्ट करावे. यानंतर प्रायव्हेट वर टॅप करा.

यानंतर अकाउंट प्रायव्हसी वर टॅप करा.

यानंतर प्रायव्हेट अकाउंट चालू करा.

यानंतर तुम्हाला अकाउंट प्रायव्हेट असल्याचा मॅसेज येईल.

  • कॅम्पुटरवर इंस्टाग्राम कसे कराल कंट्रोल

सर्वात पहिले इंस्टाग्रामवर लॉगिन करावे.

यानंतर वरच्या उजव्या कोपरऱ्यात दिसणार्‍या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करावे.

यानंतर सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला प्रायव्हेट आणि सिक्युरिटीवर टॅप करावे लागेल.

यानंतर, तुम्हाला अकाउंट प्रायव्हसी आणि प्रायव्हेट अकाउंटवरील नेक्स्ट बॉक्सवर टॅप करावे लागेल.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

एकदा तुमचे अकाउंट प्रायव्हेट झाले की, तुमचे एक्सेप्टेड युजर्स तुमच्या पोस्ट, स्टोरी आणि प्रोफाइल माहिती पाहू शकतात; जे लोक आधीच तुमचे फॉलो करत आहेत त्यांना पुन्हा रिक्वेस्ट पाठवण्याची गरज नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com