विकेंडच्या संध्याकाळी चहा सोबत अनेकांना काही तरी चटपटीत खायला आवडते. दिवसभरातही अनेकदा आपल्याला थोडीच भूक लागते तेव्हाही काही तरी हटके चमचमित खायला आवडते.
अशावेळी तुम्ही चीज टोमॅटो हा एक स्वादिष्ट नाश्ता बनवू शकता. हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्याची मजा द्विगुणित करु शकतो. हा चटकदार पदार्थ कसा बनवायचा हे जाणून घेउया.
लागणारे साहित्य
टोमॅटो
पनीर
मोझेरेला चीज
परमेसन चीज
ओरेगॅनो
चिली फ्लेक्स
कोथिंबीर
मीठ
तेल
कशी बनवायची ही डिश?
टोमॅटोचा वरचा भाग कापून बिया काढाव्या.
आता टोमॅटोला थोडे तेल लावून ग्रीस करावे.
आता किसलेले मोझेरेला चीज आणि परमेसन चीज एका भांड्यात ठेवावे.
ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
सर्व टोमॅटोमध्ये पनीर समान रीतीने भरून चांगले मिक्स करावे.
प्रत्येक भरलेल्या टोमॅटोवर चिमूटभर काळी मिरी पावडर टाकावे.
आता टोमॅटो ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा.
प्रीहिटेड ओव्हनमध्ये 220 डिग्री सेल्सिअसवर 10-12 मिनिटे बेक करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.