Lose Thigh Fat: थाय फॅट कमी करायचे असेल तर आजपासूनच आजपासून सुरू करा 'हे' काम, दिसेल लवकरच फरक

Lose Thigh Fat: लठ्ठ लोकांच्या मांड्यांवर चरबी जास्त असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Lose Thigh Fat:
Lose Thigh Fat: Dainik Gomantak
Published on
Updated on

how to lose thigh fat in week try these yoga

लठ्ठ लोकांच्या मांड्यांमध्ये चरबी जमा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. पण जेव्हा पातळ लोकांच्या मांड्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते, तेव्हा समजून घ्या की अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

याचे कारण वाढत्या वयाबरोबर अनुवांशिक आणि हार्मोनल बदल देखील असू शकतात. जर तुमच्या मांड्याही जाड होत असतील तर मांड्या शेपमध्ये आणि मजबूत ठेवण्यासाठी पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे. आठवड्याभरात तुम्हाला मांड्याची चरबी कमी झालेली दिसेल.

शरीरात सूज आल्याने

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अंगावर आणि मांड्यांमध्ये सूज वाढते आणि शरीराचा आकार बदलू लागतो. शरीरात पाणी टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठाचे सेवन कमी करावे.

इलेक्ट्रोलाइट्स वापरा

मांडीची चरबी कमी करायची असेल तर जास्त इलेक्ट्रोलाइट्स वापरा. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. इलेक्ट्रोलाइट्स असलेले पाणी प्यायल्याने चयापचय वाढते आणि मांडीची चरबी कमी होते.

सायकल चालवावी

मांडीची चरबी लवकर कमी करायची असेल तर सायकल चालवावी. तुम्हाला कुठेही जवळपास जायचे असेल तर सायकलचा वापर करा. यामुळे तुम्हाला आठवडाभरात फरक दिसतील.

कार्बचे सेवन टाळावे

तुम्ही जास्त कार्ब खात असाल तर मांडीवरची चरबी वाढू शकते. कारण कार्बोहायड्रेट्स ग्लायकोजेनमध्ये रूपांतरित होतात आणि पाण्यासोबत यकृत आणि स्नायूंमध्ये साठू लागतात. जे लोक जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट खातात त्यांचे वजन झपाट्याने वाढते.

पायऱ्या चढ-उतार कराव्या

जर तुम्हाला जिम आणि व्यायामाशिवाय मांडीची चरबी कमी करायची असेल तर पायऱ्या चढ-उतार करू शकता. याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होतो आणि मांडीची चरबीही कमी होते.

कार्डिओ करावा

कार्डिओ केल्याने मांडीची चरबी लवकर कमी होते. याशिवाय, तुम्ही धावणे आणि डान्स करून मांडीची चरबी लवकर कमी करू शकता. हे तुम्ही घरीच सहज करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com