Skin Care: व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यासाठी एकच दिवस राहिला आहे. अनेक मुली आपल्या त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात केली असेल. काही घरगुती पद्धतींचा अवलंब करतात, तर काही वेळे अभावी झटपट परिणाम देणारे प्रोडक्ट लावतात. झटपट परिणामांसाठी ब्लीच उत्तम आहे.
अनेक जण चेहऱ्यावर (Face) घरीच ब्लीच लावतात. काही लोक महिन्यातून एकदा किंवा दोनदाच वापरतात. ब्लीच केल्याने काही मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो येतो. पण ते योग्य पद्धतीने न केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. काही लोकांची त्वचा तर हे लावल्याबरोबर जळते. जर तुमच्या सोबतही असे घडत असेल तर तुम्हाला ते लावण्याची योग्य पद्धत माहित असणे गरजेचे आहे.
ब्लीच करण्यापूर्वी फॉलो करा स्किन केअर रुटिन
ब्लीच करण्यापूर्वी चेहरा चांगला पाण्याने धुवावा.
नंतर भरपुर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे.
जेव्हा ब्लीच कराल तेव्हा आपला चेहरा थंड पाण्याने धुवा आणि टिश्यूने चेहऱ्यावर टॅप करा.
आता ब्लीच लावा आणि नंतर काही वेळ राहू द्या. ब्लीच फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी लावाे. जर तुम्हाला थोडी जळजळ जाणवत असेल तर लगेच काढून टाका.
वेळ संपल्यावर चेहरा लगेच स्वच्छ करा. ते काढून टाकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने पूर्णपणे धुवा आणि नंतर मॉइश्चरायझ करा.
ब्लीच लावतांना या चुका करू नका
ब्लीचिंग केल्यानंतर उन्हात जाउ नका. तुम्ही उन्हात जात नसाल तरीही त्वचेवर सनस्क्रीन लावायला विसरू नका.
तुम्ही दुसऱ्या दिवशी सुट्टीवर जात असला तरी ब्लीच करू नका. हे एक रासायनिक उत्पादन आहे, ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकते.
काही कार्यक्रम असल्यास एक दिवस आधी ब्लीच करू नका.
ब्लीच हे एक उत्तम उत्पादन आहे. जे लावल्यानंतर चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येतो. पण त्यामुळे तुमचा रंग बदलेल असे नाही. हे करताना काळजी घेणे गरडेचे आहे. कारण ते सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.