Shankha Tips: घरात शंखनाद केल्याने सकारात्मक ऊर्जे संचारते. तसेच शंख हे माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. देवघरात शंख ठेवणे शुभ मानले जाते. भगवान विष्णू यांच्या हातात देखील शंख पाहायला मिळतो. देवघरात असलेल्या शंखाची पूजा कशी करावी हे जाणून घेउया.
धनप्राप्तीसाठी हे काम करावं
असे मानले जाते की घरता शंखु ठेवल्यास धनप्राप्ती होते. यासाठी 107 तांदळांनी शंकाला लाल कपड्यात बांधुन तिजोरीत ठेवावे. असे केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारते असे सांगितले जाते.
शंखाच्याबाबत या गोष्टी लक्षात ठेवा
शंखाच्या आत कधीही पाणी ठेवू नका.
शंख जमीनीवरही ठेवू नका.
शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर ठेवावे
पुजेच्या ठिकाणी शंख ठेवताना त्याचे मुख खालच्या बाजूस आणि उघडा भाग वरच्या दिशेने ठेवावा.
शंख नेहमी भगवान विष्णू, लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा.
अशी करावी शंखाची पूजा
प्रत्येक वस्तुंची पूजा करण्याचे अनेक नियम असतात. शंखाची पूजा करण्याचेही नियम आहे. आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर एका पात्रात शंखाला दूध, मध, गंगाजल वस्तुंचा वापर करुन आंघोळ घालावी.
त्यानंतर त्या शंखाला पुन्हा गंगाजलाने धुवावे. त्यावर फुलं, चंदन, केशर अर्पण करावे. त्यानंतर शंखाला धूप दाखवावा. तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडावेत आणि शंखाचे ध्यान करावे.
शंखपूजनानंतर हे काम करावं
आरतीनंतर पूजेच्या वेळी शंखात ठेवलेले पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. घरातल्या सदस्यांवर हे पाणी शिंपडल्यास शारीरिक आणि मानसिक विकारांपासून दुर राहतो असे मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.