Sankranti Special Til Paratha : तिळाचे लाडू खाल्ले असतीलच पण, पराठ्याची चव चाखली का?

थंडीच्या वातावरणात तिळाचे पराठा खूप फायदेशीर आहे. तिळाचा पराठा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. तिळाचा पराठा चवीला गोड असतो.
Makar Sankranti Special Til Paratha
Makar Sankranti Special Til Paratha Dainik Gomantak
Published on
Updated on

Makar Sankranti Special Parathas: मकर संक्राती काही दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी तीळ आणि तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. विशेषतः तिळाचे लाडू. पण तुम्ही कधी तिळाचा पराठा खाल्ले आहे का?

आज आम्ही तुमच्यासाठी तिळाचे पराठा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. तीळ, गूळ, तूप आणि खोबरे हे तिळ पराठा बनवण्यासाठी आवश्यक आहे.

थंडीच्या वातावरणात तिळाचे पराठा खूप फायदेशीर आहे. म्हणूनच हा पराठा खाल्ल्याने तुमचे शरीर उबदार राहते. याशिवाय तिळाचा पराठा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. तिळाचा पराठा चवीला गोड असतो. मकर संक्रांतीच्या सणाला हे करून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

  • तीळ पराठा बनवण्यासाठी साहित्य

गव्हाचे पीठ- 1 वाटी

तीळ- 1/2 वाटी (भाजलेले)

गूळ-1 वाटी

देशी तूप- 50 ग्रॅम

नारळ किसून

Makar Sankranti Special Til Paratha
Job In India: बंपर नोकर भरती! लोकसभा निवडणुकीपूर्वी 'ही' कंपनी देणार 1.5 लाख नोकऱ्या

तीळ पराठा कसा बनवायचा?

  • तिळाचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ परातीत चाळून घ्या.

  • आता त्यात २ चिमूट मीठ, तीळ आणि नारळ किसून आणि गूळ वितळवून घ्या.

  • आता मऊ पीठ मळून घ्या. 15 मिनिटे पीठ सेट करण्यासाठी ठेवा.

  • कढईला तूप लावून गरम करा.

  • पिठाचे गोळे करून पराठ्यासारखे लाटून घ्या.

  • आता पराठा गरम तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता तुमचा चविष्ट आणि आरोग्यदायी तिळाचा पराठा तयार आहे.

  • आता त्यावर पांढरे बटर लावून गरम चहासोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com