Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनावा हेल्दी सोया टिक्की!

जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात काही आरोग्यदायी खायचे असेल तर सोया टिक्की नक्की ट्राय करा.
Morning Breakfast Recipe
Morning Breakfast RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

Healthy Morning Breakfast Recipe: सोया टिक्की हेल्दी स्नॅक म्हणून एक उत्तम पदार्थ आहे. तुम्ही ही टिक्की सकाळच्या नाश्त्यात बनवू शकता. सोयामध्ये भरपूर प्रोटीन असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

सोयाचे सेवन शरीरातील स्नायू मजबूत करण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये असलेले पोषक तत्व वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतात.

सोया टिक्की हेल्दी (Healthy) असण्यासोबतच चवदारही लागते. जर तुम्ही सोया टिक्कीची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल, तर आम्ही सांगत आहोत त्या पद्धतीने तुम्ही अगदी सहज ही टिक्की बनवू शकता.

Morning Breakfast Recipe
Lifestyle: 'या' स्मार्ट ट्रिक वापरुन सेट करा तुमचं वॉर्डरोब!
  • सोया टिक्की बनवण्यासाठी साहित्य

सोया - 200 ग्रॅम

बेसन - 100 ग्रॅम

हळद - 1/2 टीस्पून

लाल तिखट - 1/2 टीस्पून

बडीशेप - आवश्यकतेनुसार

आले-लसूण पेस्ट - 1/2 टीस्पून

चाट मसाला - 1/2 टीस्पून

तेल - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

  • सोया टिक्की कशी बनवायची?

पहिले एका भांड्यात पाणी गरम करून त्यात सोया वडी टाकून अर्धा तास ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर सोया पाण्यातून बाहेर काढून त्यांचे पाणी चांगले पिळून घ्यावे.

आता पाण्यात भिजवलेली सोया वडी मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगली बारीक करून घ्यावी.

सोया वडी व्यवस्थित बारीक करायला 1 ते 2 मिनिटे लागू शकतात. यानंतर ग्राउंड सोया वडी एका भांड्यात काढा. आता सोया वडीमध्ये आले-लसूण पेस्ट घालून मिक्स करा.

Morning Breakfast Recipe
In Real Love : "मला त्याने जबरदस्तीने किस केले" रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धकाच्या आरोपानंतर खळबळ

यानंतर सोया मिश्रणात बेसन, हळद, लाल तिखट, चाट मसाला आणि इतर कोरडे मसाले घालून चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य नीट मिक्स करून मिश्रण तयार करा. यानंतर हाताने थोडे-थोडे मिश्रण घ्या आणि सोया टिक्की बनवून प्लेटमध्ये ठेवा.

आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात सोया टिक्की टाकून तळून घ्यावे. तळताना सोया टिक्की फिरवत राहा. टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर प्लेटमध्ये काढा.

त्याचप्रमाणे सर्व सोया टिक्की तळून घ्या. चविष्ट आणि आरोग्यदायी सोया टिक्की तयार आहेत. त्याला सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह करा आणि चव चाखा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com