Monsoon Tips: पावसाळ्यात पटकन ओले कपडे सुकण्यासाठी वापरा 'या' 3 भन्नाट ट्रिक्स

पावसाळ्यात कपडे लवकर सुकवण्यासाठी तुम्ही या ट्रिक्स वापरू शकता.
Monsoon Tips
Monsoon TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Tips: पावसाळा सुरू झाला असून अनेक अडचणी देखील निर्माण करतो. पावसाळ्यात सुर्यप्रकाश बराचवेळ नसतो. यामुळे कपडे लवकर सुकत नाही. असा वेळी तुम्ही या काही भन्नाट ट्रिक्स वापरून कपडे सुकवून पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता.

  • न्यूज पेपर वापरा

जर तुम्हाला ओले कपडे सुकवायचे असतील तर तुम्ही न्यूज पेपरचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही ओले कापड उलटे करा आणि मग ते वर्तमानपत्राच्या मध्यभागी ठेवून जोरात प्रेस करावे. जर कपडे एकाच वेळी सुकले नाहीत तर ही प्रक्रिया पुन्हा करावी. पण न्युज पेपर वापरतांना काळजी घ्यावी. लाइट कपड्यांवर पेपरची शाई लागू शकते.

  • ओल्या कपड्यांवर प्रेस फिरवावी

पावसाळ्यात प्रेसने कपडे सुकवणे हा एक उत्तम पर्याय आहे. इलेक्ट्रिक प्रेसचा वापर करून तुम्ही कपडे सकवू शकता. यामुळे पावसाळ्यातही कपडे लवकर कोरडे होतील आणि तुम्ही ते घालून लगेच बाहेर जाऊ शकता.

  • हेअर ड्रायर वापरा

पावसाळ्यात तुम्ही हेअर ड्रायर वापर करून कपडे सुकवू शकता. तसे तर हेअर ड्रायरचा वापर हा केस सुकवण्यासाठी केला जातो. पण यातुन येणाऱ्या गरम हेवमुळे तुम्ही कपडेही सुकवू शकता.

Monsoon Tips
Remedies on Headache: डोकेदुखीवर रामबाण आहेत 'हे' हर्बल ऑइल
  • पंख्याखाली वाळवा 

ही सर्वात सामान्य आणि सोपी पद्धत आहे. म्हणून ती जवळजवळ प्रत्येक घरात वापरली जाते. सर्वप्रथम, ओले कपडे पिळून फॅनखाली किंवा टेबल फॅनसमोर ठेऊ शकता. पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे कपडे लवकर सुकतात.

  • टॉवेल वापरा

तुम्ही ओले कपडे सुकवण्यासाठीही टॉवेल वापरू शकता. यासाठी आधी ओले कापड पिळून घ्या, नंतर कोरड्या टॉवेलच्या मध्यभागी गुंडाळा. आता पुन्हा पिळून घ्या. असे केल्याने, टॉवेलमधील बहुतेक ओलावा निघून जाईल आणि नंतर आपण ते पंख्याखाली सहज सुकवू शकता.

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी अशी करा दूर

  • कपडे जमा करून ठेऊ नका

बहुतेक लोक त्यांचे रोजचे कपडे धुण्यासाठी एका पिशवीत किंवा वॉशिंग मशिनमध्ये जमा करून ठेवतात. पावसाळ्यात कपडे बंद ठिकाणी ठेवल्याने वास येतो, जो धुतल्यानंतरही जात नाही. म्हणूनच दोरीवर कपडे वेगळे ठेवा आणि धुतल्यानंतर ते मशीनने वाळवे.

  • नियमितपणे कपडे धुवावे 

ओले आणि खराब कपडे आजूबाजूला ठेवू नका. जितक्या लवकर तुम्ही ते धुवाल तितक्या कपड्यांना दुर्गंधी कमी होईल म्हणून कपडे नियमित धुवावे.

  • व्हिनेगर, बेकिंग सोडा वापरा 

तुमची नियमित वॉशिंग पावडर कपड्यांमधून येणारा वास दूर करू शकत नाही. यासाठी तुमच्या डिटर्जंटसोबत पाण्यात थोडा व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांमधून दुर्गंधी येणार नाही.

  • घरात कपडे वाळवावे

जर सतत पाऊस पडत असेल आणि तुम्ही तुमचे कपडे धुतले असतील तर पाऊस कमी होण्याची वाट पाहू नका. कपडे पसरून घरातील पंख्याच्या हवेत वाळवा. सूर्य बाहेर आल्यावर कपडे उन्हात वाळवा.

  • लिंबाच्या रस

तुम्ही ज्या पाण्यात कपडे भिजवत आहात त्यात लिंबाचा रस देखील टाकू शकता. यामुळे वास येणार नाही आणि कपडे फ्रेश राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com