Instagram वर लोकांचे पोस्ट अन् रील पाहून आलाय कंटाळा? मग 'असे' करा इग्नोर

इंस्टाग्रामवरील इतरांच्या पोस्ट, रील,स्टोरी इत्यादींपासून तुम्ही कंटाळले असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Instagram
Instagram Dainik Gomantak
Published on
Updated on

Instagram Tips: मेटा चे इंस्टाग्राम मॅसेजिंग अ‍ॅप इंस्टाग्राम जगभरात प्रसिद्ध आहे. हे अ‍ॅप सर्वांच्या मोबाइलमध्ये आहे. आज लोक इंस्टाग्रामच्या माध्यमातून नवीन मित्रच बनवत नाहीत तर पैसेही कमवत आहेत. 

या अ‍ॅपवर तुम्ही व्हिडिओ, रील, फोटो, स्टोरी अशा अनेक गोष्टी करू शकता. तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की तुम्हाला इन्स्टाग्रामवर एखाद्याला अ‍ॅड केले आहे आणि ते तुमचे रील, फोटो किंवा व्हिडिओ पाहत नाहीत,परंतु तुम्ही त्यांचा सर्व मजकूर पाहत आहात. 

हे तुमच्या बाबतीत घडले असेल. अशा वेळी अनेकवेळा त्या व्यक्तीला अनफॉलो करण्याचा विचार तुमच्या मनात आला असेल. हो ना! पण आपण मैत्रीमुळे असे करत नाही.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा लोकांची पोस्‍ट कसे इग्नोर करु शकता हे सांगणार आहोत. म्हणजेच अनफॉलो न करता तुम्ही त्यांच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकता जसे ते करत आहेत. समोरच्या व्यक्तीला अजिबात जाणवणार देखील नाही. इंस्टाग्रामवर स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्यासाठी अनेक पर्याय देते.

  • लाइव्ह अपडेट बंद करा

जे लोक इंस्टाग्रामवर जास्त अ‍ॅक्टिव असतात, ते सतत लाइव्ह येत असतात. ते लाइव्ह आल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळते. त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी थेट नोटिफिकेशन बंद करावे. हे करण्यासाठी, तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जावे लागेल आणि वरच्या उजवीकडे दिसणार्‍या बेल आयकॉनवर क्लिक करावे लागेल आणि येथे सेटिंग बदलावे लागेल.

  • म्यूट

इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीला म्यूट केल्याने तुम्हाला त्यांच्याशी संबंधित कोणतेही अपडेट्स मिळणार नाहीत. म्यूट करण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन अन-फॉलो बटणावर क्लिक करावे लागेल आणि म्यूट पर्याय निवडावा लागेल. इथे तुम्हाला पोस्ट, स्टोरी, इत्यादीचा पर्याय मिळेल, ते सर्व ऑन करावे.

Instagram
चुकून भलत्याच बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत का? Recovery Process जाणून घ्या
  • रेस्ट्रिक्ट

तुम्हाला हवे वाटल्यास इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीस रेस्ट्रिक्ट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला वर नमूद केलेली पद्धत फॉलो करावी लागेल आणि अनफॉलो करण्यासाठी आल्यावर Restrict बटणावर क्लिक करावे लागेल. रेस्ट्रिक्ट व्यक्तीला आपण रेस्ट्रिक्ट केले आहे हे कळणार नाही. समोरची व्यक्ती तुम्हाला ऑनलाइन पाहू शकणार नाही किंवा त्याने त्याचा मॅसेज पाहिला की नाही हेही कळू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com