Blood Cleansing Foods: अशुद्ध रक्त शुध्द करण्यासाठी 'या' पदार्थांचे करावे सेवन

आजकाल लोक रासायनिक घटक असलेल्या पदार्थांचे सेवन करतात.
Blood Cleansing Foods
Blood Cleansing FoodsDainik Gomantak
Published on
Updated on

निरोगी आणि फिट राहण्यासाठी रक्त निरोगी असणे गरजेचे आहे. तुम्ही जे काही खाता-पिता त्याचा तुमच्या रक्ताच्या आरोग्यावरही परिणाम होतो. खाण्यापिण्यात विविध प्रकारची रसायने आणि घटक असतात, जे तुमच्या रक्तात हळूहळू विरघळतात. हे विषारी पदार्थ रक्तात शिरून नसा खराब करू शकतात, कोलेस्टेरॉलचा धोका वाढू शकतात, किडनी आणि यकृताला धोका निर्माण होउ शकतो.

रक्त कसे स्वच्छ करावे? उत्तम आरोग्यासाठी रक्त स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रक्तातील कोणत्याही प्रकारची घाण तुमच्या बाह्य आणि अंतर्गत अवयवांना हानी पोहोचवू शकते. रक्त स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लोह, व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढण्यास आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत होते.

रक्तामध्ये समाविष्ट असलेल्या खराब पदार्थांमुळे रक्त विषबाधा होऊ शकते. याचा अर्थ रक्त शुद्ध न केल्यास रक्तामध्ये विषारी पदार्थ तयार होतात आणि अशुद्ध रक्त सर्व अवयवांवर परिणाम करू शकते. जेव्हा रक्त खराब असते, तेव्हा तुम्हाला अनेक लक्षणे जाणवू शकतात.

1) उच्च ताप

2) हृदय गती वाढणे

3) श्वासोच्छवासाची समस्या

4) त्वचेवर लाल खुणा

हिरव्या पालेभाज्या

ब्रोकोली आणि पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा (Green Vegetable) आहारात समावेश करावा. या गोष्टी लोह आणि कॅल्शियमसह सर्व आवश्यक पोषक तत्वांनी परिपुर्ण आहे.

green vegetable
green vegetableDainik Gomantak

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस, मनुका आणि मधामध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असते. या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. तसेच लोहाची कमतरता कमी होते.

orange juice
orange juiceDainik Gomantak

गव्हाच्या ओंब्याचा रस

जर तुम्हाला आधीच रक्ताशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा असेल तर तुम्ही गव्हाचा रस प्यावा. याशिवाय टोफू आणि बीन्समध्येही भरपूर प्रमाणात लोह असते आणि ते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.

wheat grass juice
wheat grass juiceDainik Gomantak

सफरचंद

सफरचंद (Apple) आणि एवोकॅडोसारखी फळे व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. याच्या नियमित सेवनाने रक्तात (Blood) साचलेली घाण साफ होते. पेक्टिन हा सफरचंदातील फायबरचा एक वेगळा प्रकार आहे. जो शरीरातील जड धातू काढून टाकण्यास मदत करतो. व्हिटॅमिन सी सारखे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करतात.

Apple
AppleDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com