Guruwar Upay on Guru Dosh: हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. आज गुरुवार असुन हा दिवस भगवान श्रीविष्णू यांना समर्पित असतो. भगवान श्रीविष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत.
श्रीविष्णूंच्या आज्ञेप्रमाणेच या सृष्टीचा संपूर्ण कारभार चालत असतो. गुरु म्हणजे कौटुंबिक आणि सांपत्तिक स्थितीचा कारक मानला गेला आहे. ज्यांना पैशाशी संबंधित काही समस्या असतील किंवा गुरुदोष असेल त्यांनी या मंत्राचा जप करावा.
गुरुचा दोष दूर करण्यासाठी काय करावे
1) गुरूचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे. यासोबतच स्नान करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा.
2) गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही.
3) भगवान विष्णुला पिवळ्या वस्तू खूप आवडतात. म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ, फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करावे.
4) गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवा. असे केल्याने घरात धनसंपत्ती येते.
5) गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि देऊ नका. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरूची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.