VIP Number: कार अन् दुचाकीसाठी व्हीआयपी नंबर हवा असेल तर फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

VIP Number Plate: जर तुम्हाला कार आणि दुचाकीला 'VIP Numbar' प्लेट हवी असेल तर पुढील सिंपल टिप्सची मदत घेऊ शकता.
VIP Number
VIP NumberDainik Gomantak
Published on
Updated on

how can we get vip number plate for car or bike read easy steps

अनेक लोकांमध्ये कार आणि बाईकची लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. अनेकदा लोक वाहनाच्या नवीन मॉडेलबद्दल उत्सुक दिसतात. काही लोकांना कार आणि बाईकमध्ये लावलेल्या एलईडीचे वेड असते तर काहींना फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ असते.

नवीन कार खरेदी केल्यावर त्यांच्या कार किंवा बाईकवर चांगली नंबर प्लेट बसवायची असते. काही लोक युनिक नंबर प्लेट किंवा व्हीआयपी नंबर प्लेट लावतात. जर तुम्हालाही व्हीआयपी नंबर प्लेट लावायची असेल तर पुढील गोष्टी फॉलो करू शकता.

तुम्ही पुढील सात स्टेप फॉलो करून कार किंवा वाइकवर व्हिआयपी नंबर प्लेट लावू शकता.

व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी सर्वात पहिले नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला भारत सरकार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर जावे लागेल. तेथे सार्वजनिक यूजर म्हणून नोंदणी करावी लागेल.

नोंदणी केल्यानंतर तेथे तुम्हाला हवा असलेला VIP नंबर टाकावा लागेल.

यानंतर नोंदणी फी आणि व्हीआयपी नंबर बुकिंग फी भरावी लागेल.

पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या निवडलेल्या नंबरच्या बिडिंग प्रोसेसमध्ये सहभागी होऊ शकता. असे होऊ शकते की तुम्ही निवडलेल्या नंबरसाठी इतर कोणीतरी नोंदणी केली असेल. तुमचा आवडता नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला बिडिंग प्रोसेसचा एक भाग व्हावे लागेल.

बिडिंग दरम्यान तुम्हाला VIP नंबरसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. व्हीआयपी नंबर मिळाल्यानंतर उर्वरित रक्कमही जमा करावी.

यानंतर तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जावे लागेल आणि तुमचा व्हीआयपी नंबर मिळवण्याबाबत माहिती मिळवा आणि मिळालेल्या नंबरनुसार तुमच्या वाहनावर टाका.

अशा प्रकारे तुम्हाला व्हीआयपी नंबर मिळू शकेल. व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी सामान्य संख्येच्या तुलनेत अतिरिक्त निधी जमा करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com