12वी नंतर करा 'हा' कोर्स, परदेशातही मिळेल लाखोंची नोकरी

हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रात मिळतील नोकऱ्या
Hotel management
Hotel managementDainik Gomantak
Published on
Updated on

देश-विदेशात नोकरी (JOB) करायची असेल, तर बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) हा उत्तम कोर्स होऊ शकतो. हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित कोणत्याही व्यवस्थापनाला हॉटेल मॅनेजमेंट म्हणतात. हॉटेल, रेस्टॉरंटची सेवा, उत्पादन आणि व्यवसाय व्यवस्थितपणे चालवण्याच्या कलेला हॉटेल मॅनेजमेंट तसेच एचएम म्हणतात. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अशा अनेक कला शिकवल्या जातात, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व तर विकसित होतेच पण ग्राहकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याची कलाही शिकवली जाते.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी पात्रता

हॉटेल मॅनेजमेंट हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. यामध्ये बॅचलर पदवी मिळविण्यासाठी 55 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी, पदवीधर असणे आवश्यक आहे. काही संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते जी देणे अनिवार्य असते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू इच्छिणारे विद्यार्थी यूजी लेव्हल कोर्स करण्यासाठी पात्र आहेत आणि जे विद्यार्थी पदवी पूर्ण केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटशी संबंधित कोर्स करू इच्छितात ते पीजी लेवलचा कोर्स करू शकतात. हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स देखील आहे जो 1, 2 किंवा 3 वर्षांचा असतो.

Hotel management
जपान भारतात करणार 42 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, दोन्ही देशांची आज भेट

कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला या क्षेत्रात मिळतील नोकऱ्या

  • मॅनेजर ऑफ होटल

  • किचन मॅनेजर

  • इवेंट मॅनेजर

  • फ्रंट ऑफिस मॅनेजर

  • बॅक्वेट मॅनेजर

  • शेफ

  • डायरेक्टर ऑफ़ होटल ऑपरेशन

  • फ्लोर सुपरवाइजर

  • हाउस कीपिंग मॅनेजर

  • गेस्ट सर्विस सुपरवाइजर/ मॅनेजर

  • वेडिंग कोऑर्डिनेटर

  • रेस्टोरेंट मॅनेजर

  • फ़ूड सर्विस मॅनेजर

  • फ़ूड एंड वेबरेज सुपरवाइजर

Hotel management
Mumbai Metro Rail Recruitment: मुंबई मेट्रोमध्ये अर्ज करा आणि दरमहा दोन लाखांपर्यंत पगार मिळवा

किती मिळणार वेतन

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर, तुम्हाला हॉटेलमध्ये मॅनेजरपासून अनेक पदांपर्यंत नोकरी मिळू शकते. सुरुवातीला तुमचे पॅकेज 2-3 लाखांचे असू शकते परंतु काही अनुभवानंतरच तुमची चांगली वाढ होते. सुमारे 10 वर्षे काम केल्यानंतर, तुम्ही चांगल्या पॅकेजपर्यंत पोहोचू शकता. जर तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळाली तर तुमचा पगार यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो. याशिवाय देश-विदेशातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये काम करण्याची संधीही हा कोर्स केल्याने मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com