Homemade Rose Water: घरगुती गुलाबजल त्वचेसाठी ठरते वरदान, जाणून घ्या कसे बनवायचे

Homemade Rose Water: तुम्हाला घरीच शुद्ध गुलाबजल बनवायचे असेल तर पुढील पद्धतीनुसार तयार करू शकता.
rose water
rose waterDainik Gomantak
Published on
Updated on

homemade rose water how to make rose water home follow step by step

प्रत्येकालाच त्वचा चमकदार आणि फ्रेश असावी असे वाटते. यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअर ट्रीटमेंट घेतात. त्वचेची काळजी घेण्याचे ट्रीटमेंट खूप महाग आहेत, परंतु काहीवेळा असे होते की ते तुमची त्वचा चमकण्याऐवजी खराब करतात. या भीतीपोटी अनेकजण घरगुती गोष्टींवर अधिक अवलंबून असतात.

तुम्ही घरगुती गुलाबजल वापरू शकता. यामुळे त्वचेवर गुलाबी चमक येते. तुमच्या त्वचेची चमक तर कायम राहतेच पण त्याचबरोबर त्वचा हायड्रेटही राहते. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, म्हणून घरी गुलाबजल कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

गुलाबजल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ताज्या गुलाबाच्या पाकळ्या

  • पाणी

गुलाबजल बनवण्याची कृती

सर्वात पहिले गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवाव्या. यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्या. यानंतर पाणी मंद आचेवर उकळावे. पाण्याचा रंग बदलून गुलाबाचा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करावा. नंतर उकळल्यानंतर पाणी थंड होऊ द्या.

पाणी थंड झाल्यावर गुलाबाच्या पाकळ्या काढा आणि सुती कापडाच्या साहाय्याने पाणी व्यवस्थित गाळून घ्या. हे फिल्टर केलेले पाणी एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. घरगुती गुलाबजल त्वचेसाठी हानिकारक नसते. तुम्ही दिवसातून अनेक वेळा वापरू शकता.

गुलाब पाण्याचे फायदे

गुलाबजल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट घटक असतात. यामुळे चेहरा फ्रेश वाटतो. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकार राहते.

डोळे जळजळ करत असेल तर तुम्ही कॉटन गुलाबजलमध्ये भिजवून डोळ्यांवर ठेऊ शकता.

त्वचा हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही गुलाब जलने चेहरा स्वच्छ करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com