Summer Care Tips: पायांवरचे टॅनिंग कमी करायचे असेल तर 'या' उपायांचा करा वापर

Summer Tips: उन्हाळ्यात सर्वांनाच टॅनिंगचा त्रास होतो. परंतु फरक एवढाच आहे की काहींना कमी आणि काहींना जास्त मिळते.
Tanning Removal Tips
Tanning Removal TipsDainik Gomantak
Published on
Updated on

home remedies how to remove tanning for feet

सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅनिंग चेहऱ्यावर असो वा हात-पायांवर कुठेही चांगले दिसत नाही. ते दूर करण्यासाठी अनेक उपायांचा वापर करतो. अगदी पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घेतो. उन्हाळ्यात सर्वांनाच टॅनिंगचा त्रास होतो. परंतु फरक एवढाच आहे की काहींना कमी आणि काहींना जास्त मिळते. ही समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

एलोवेरा आणि कोरफड जेल

एलोवेरा जेलमध्ये थोडे बदामाचे तेल मिक्स करावे आणि नंतर ते पायाला लावा आणि तासाभरानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे पायांवरचे टॅनिंग कमी होईल.

दूध-हळद आणि टोमॅटो पावडर

हळद पावडरमध्ये टोमॅटोची पेस्ट आणि थोडे दूध मिक्स करावे, आणि नंतर पायाला लावावे. १५ - २० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने पाण्याने धुवावे.

कच्चे दूध आणि तांदळाचे पीठ

कच्च्या दुधात तांदळाचे पीठ मिक्स करावे. ही पेस्ट पायाला लावावी आणि घासून घ्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा आणि दही

पायावर खूप टॅनिंग होत असेल तर बेकिंग सोडा पावडरमध्ये दही चांगले मिक्स करा आणि पायाला लावा. अर्ध्या तासानंतर, मसाज करून काढून टाका आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

संत्र्याची साल आणि दही

संत्र्याच्या सालीमध्ये दही चांगले मिक्स करावे. नंतर ते पायाला चांगले लावा आणि ते सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

मध, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस

ऑलिव्ह ऑईलमध्ये मध आणि लिंबाचा रस चांगले मिसळा आणि नंतर पायाला लावा आणि एक तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

पपई आणि मध

पपई आणि मध टाकून चांगले मिक्स करा आणि पायाला लावा आणि ते सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com