Home Remedies: स्पर्धेच्या युगात कामाचा ताण लोकांच्या मनावर इतका हावी होतो की ते तणावग्रस्त होतात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही अनेक वेळा लोक निर्जीव, थकलेले आणि कोमेजलेले दिसतात. मनाला शांतता हवी असेत. तुम्हालाही असेच वाटते का? तुम्हालाही कधीकधी अस्वस्थ वाटतं का? तर तुम्ही तज्ञांनी दिलेल्या काही टिप्सची मदत घेऊ शकता, ज्यामुळे तुम्ही तणाव कमी करू शकता. चला जाणून घेऊया ऑफिसचा थकवा दूर करण्यासाठी काय करायला हवे.
अनेकदा काही लोक घरी आल्यानंतरही फोनवर व्हिडीओ, रिल्स पाहात बसतात. फक्त ऑफिसशी संबंधित गोष्टी करणे असे अजिबात करू नका. तुमच्या मोकळ्या वेळेत मित्रांशी गप्पा माराव्या. आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वेळ घालवावा. तुमचे विचार त्यांच्याशी शेअर करावे, त्यांचे शब्द ऐकावे, यामुळे तणाव दूर होतो. तुम्ही हसून आणि विनोद करून स्वतःला रिलॅक्स करू शकता. यामुळे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात.
ऑपिसमधील काम पूर्ण केल्यानंतर स्वतःला रिलॅक्स करणे खूप महत्वाचे आहे आणि स्वतःला रिलॅक्स करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दिर्घ श्वास घेणे. यामुळे तुम्ही नकारात्मक गोष्टी काढून सकारात्मक गोष्टी आणू शकता. त्याच्या मदतीने मानसिक तणावापासून शारीरिक थकवापर्यंत सर्व काही दूर होते. जेव्हाही तुम्ही ऑफिसमधून घरी याल तेव्हा 10 मिनिट डिप ब्रीदिंग करावे. यामुळे मन शांत होईल आणि शरीर सक्रिय राहील.
स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी सोशल मिडियापासून दूर राहावे. तुम्ही पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचू शकता. यामुळे ज्ञानात भर पडते.
आर्ट थेरपी देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेव्हा तुम्ही रंगांच्या दुनियेत वेळ घालवता तेव्हा त्यातून सकारात्मकता वाढते. यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. काहीतरी नवीन केल्याने आनंद मिळतो आणि मानसिक थकवा नक्कीच दूर होतो.
शारीरिक थकवा दूर करण्यासाठी आपण व्यायाम किंवा योगा करणे आवश्यक आहे. यामुळे स्ट्रेस हार्मोन्सही कमी होतात. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. सकारात्मकत भावना निर्माण होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.