फॅट अन् शुगरयुक्त आहार घेत असाल तर सावधान! 'स्मरणशक्ती'साठी ठरतो धोकादायक, अभ्यासातून खुलासा

High fat sugar diet memory: आजकाल डिमेंशियासारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजाराची काही न्यूरोलॉजिकल कारणे देखील आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, फॅट आणि शुगरचे प्रमाण असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती कमकुवत होते.
High fat sugar diet memory
High fat sugar diet memoryDainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल डिमेंशियासारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजाराची काही न्यूरोलॉजिकल कारणे देखील आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, फॅट आणि शुगरचे प्रमाण असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील स्मरणशक्ती कमकुवत होते. होय, हे ऐकून चकीत झालात ना... नवीन संशोधनात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त फॅट आणि शुगरचे प्रमाण असलेले अन्न केवळ आपले वजन आणि हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाहीतर आपल्या मेंदूवरही वाईट परिणाम करते. विशेषतः मेंदूच्या त्या भागावर जो स्मृतीशी संबंधित आहे.

High fat sugar diet memory
Lung Cancer: शरीर देते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संकेत, 'या' लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या उपचार

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाचे डॉ. डोमिनिक ट्रॅन यांनी केलेल्या या संशोधनात 18 ते 38 वयोगटातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल विचारण्यात आले आणि नंतर त्यांना एका व्हर्च्युअल रिअॅलिटी गेममध्ये भाग घेण्यास सांगितले गेले, ज्यामध्ये त्यांना एका चक्रव्यूहातून मार्ग काढत खजिना शोधावा लागणार होता. यादरम्यान त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) देखील नोंदवला गेला.

कमी फॅट आणि साखर असलेल्या लोकांची स्मरणशक्ती अधिक मजबूत

संशोधनाच्या निकालावरुन स्पष्ट झाले की, जे विद्यार्थी कमी फॅट आणि शुगरयुक्त असलेले खाद्यान्न खात होते त्यांना खजिना शोधताना जास्त कठिण गेले नाही, तर ज्यांनी आठवड्यातून अनेक वेळा फॅट आणि शुगरचे सेवन केले त्यांची मात्र कामगिरी सुमार होती.

High fat sugar diet memory
Colorectal Cancer: 'कोलन' कर्करोगावर मात करण्यासाठी 'व्हिटॅमिन डी' कसं ठरतं संरक्षक? संशोधनातून मोठा खुलासा समोर

यावरुन शास्त्रज्ञांना असा निष्कर्ष काढला की, जास्त फॅट आणि शुगरयुक्त खाद्यपदार्थ हिप्पोकॅम्पसला नुकसान पोहोचवू शकतात. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हिप्पोकॅम्पस हा तोच भाग आहे जो अल्झायमरसारख्या आजारांमध्ये पहिल्यांदा प्रभावित होतो. जर हा भाग खराब झाला तर स्मरणशक्ती कमकुवत होते. शुगर आणि फॅट जास्त असलेले अन्न मेंदूच्या या भागावर देखील परिणाम करु शकते.

डॉ. ट्रॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आम्हाला माहित होते की जास्त फॅट आणि शुगर खाल्ल्याने लठ्ठपणा, हृदयरोग आणि काही कर्करोगाचा (Cancer) धोका वाढतो. पण आता हे देखील स्पष्ट झाले आहे की, ते मेंदूचे आरोग्य देखील लवकर बिघडवू शकते आणि तेही लहान वयात, जेव्हा सामान्यतः मेंदू पूर्णपणे तंदुरुस्त राहतो.

डिमेंशियाचा धोका वाढतो

डॉ. ट्रॅन यांच्या मते, जर आपण वेळेत आपला आहार (Diet) बदलला तर हिप्पोकॅम्पसचे आरोग्य सुधारणे शक्य आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही आतापासून आरोग्यदायी आहार घेणे सुरु केले तर तुम्ही तुमची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची शक्ती मोठ्या प्रमाणात वाचवू शकता.

High fat sugar diet memory
Lung Cancer: फुफ्फुस कर्करोगाच्या निदानासाठी AI ची मदत! विश्‍वजित राणेंनी दिली माहिती; 50842 नागरिकांची तपासणी

डिमेंशियाची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

छोट्या दैनंदिन कामांमध्ये गोंधळ होणे

गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणे

बोलताना शब्द विसरणे

वेळ आणि ठिकाणाबद्दल गोंधळ होणे

अचानक मूड स्विंग्स होणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com