हिंदू नववर्ष 2 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे, महाराष्ट्रात याला गुढी पाडवा म्हणतात. या दिवसापासून नवरात्रीलाही सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये भक्त देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अनेक उपाय करतात. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद आणायचा असेल आणि तुमच्या घरात नवरात्रीचे 9 दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षातील 365 दिवस सुख-समृद्धी आणि आनंद राहावा, असे वाटत असेल, तर गुढीपाडव्याला काही लहान-सहान उपाय करणे आवश्यक आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय खूप फायदेशीर ठरतात, ज्याचा फायदा तुम्हाला वर्षभर होवू शकते.
गुढीपाडव्याला हे उपाय करा
* उद्या 2 एप्रिलला शनिवार आहे, बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी गुळामध्ये चमेलीचे तेल मिसळून हे तेल अर्पण करा. यानंतर हनुमान चालीसा वाचताना बजरंगबलीची सात प्रदक्षिणा करा. हा उपाय तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करेल.
* गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुम्ही जिथे व्यवसाय करता त्या ठिकाणी काही हरिद्राचे धान्य ठेवा. हे उपाय केल्याने तुमच्या घरात धनसपत्ती वाढेल.
* जर तुमच्या व्यवसायात विनाकारण अडथळे निर्माण होत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुलीकडून एक वाटी तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा, तुमची धान्य संपत्ती वाढेल.
* गणेश मंदिरात जा आणि गणपतीला पाच सुपारी आणि 21 दूर्वा अर्पण करा. हे उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही.
* हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर घरभर गंगाजल शिंपडा. यासोबतच दुर्गा माताचे ध्यान करावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहील आणि तुमचे संपूर्ण वर्ष चांगले जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.