Vegetable Juice: डायटिंग नाही तर या भाज्यांचा रस पिऊन करा Weight Loss

Vegetable Juice For Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीमला जात असाल योगा करत असाल तरीसुद्धा फरक दिसत नसेल तर पुढील फळ भाज्यांचा रस पिऊ शकता.
Vegetable Juice:
Vegetable Juice: Dainik Gomantak
Published on
Updated on

healthy Vegetable Juice For Weight Loss try at home

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करतात. परंतु उपाशी राहणे हा वजन कमी करण्याचा अजिबात योग्य मार्ग नाही. त्यामुळे तृष्णा आणखीनच वाढते आणि मग त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा हाताला येईल ते खाऊन पोट भरण्याचा प्रयत्न करतात. पोटाची चरबी कमी करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे फळे आणि भाज्यांचे ज्यूस पिणे, चला तर मग जाणून घेऊया कोणते भाज्यांचे रस प्यायल्याने वजन कमी होते.

भोपळ्याचा रस

यामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वांबरोबरच इतर अनेक आवश्यक खनिजे देखील आढळतात. जे पचन व्यवस्थित ठेवते आणि पोटाच्या समस्या दूर ठेवते. याशिवाय बोपळ्याच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. हे प्यायल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

गाजर रस

गाजर बाजारात बाराही महिने मिळतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. गाजरांमध्ये पेक्टिन असते, जे विरघळणारे फायबर असते. यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होते आणि मधुमेहासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. गाजराचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पालक रस

पालक ही अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली अतिशय फायदेशीर भाजी आहे. पालक खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. पालकामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. पालकाच्या ज्यूसमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

काकडी

उन्हाळ्यात काकडी खाणे फायदेशीर असते. कारण काकडी खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहते. काकडीच्या रसात अनेक पोषक घटक असतात. त्याचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि वजनही नियंत्रणात राहते. इतकेच नाही तर काकडीचा रस प्यायल्याने त्वचेवर चमकही येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com