Healthy Tips: न्युजपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध... अन्यथा आजारांना द्याल आमंत्रण

न्युजपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हीही असे खाद्यपदार्थ खात असाल तर आजच खाणे बंद करा.
food wrapped in newspaper
food wrapped in newspaperDainik Gomantak
Published on
Updated on

Healthy Tips: अनेकदा आपण पाहतो की लोक न्युजपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ रस्त्याच्या कडेला, ट्रेनमध्ये आणि बसमध्ये बसून खातात. हातगाडीवर चना मसाला, भेळपुरी इत्यादी खाद्यपदार्थ हे न्युजपेपरमध्ये गुंडाळून विकले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आरोग्यासाठी किती खर्चिक ठरू शकते? न्युजपेपरमध्ये अनेक हानिकारक रसायने आणि शाई वापरले जातात. जे खाद्यपदार्थासोबत तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. न्युजपेपरवर ठेवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने कोणते आजार होतात ते जाणून घेऊया.

  • हार्मोन्स असंतुलित

न्युजपेपरच्या कागदाची शाई अनेक घातक रसायनांनी बनलेली असते. आयसोप्रोपाइल अल्कोहोल, पॉलिथिलीन ग्लायकॉल, डायथिलीन ग्लायकॉल यांसारखी रसायने सामान्यतः न्युजपेपरच्या शाईमध्ये वापरली जातात. न्युजपेपरच्या शाईमध्ये असलेले विषारी पदार्थ अन्नात मिसळून शरीरात प्रवेश करतात आणि हार्मोन्समध्ये व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे थायरॉईड, इन्सुलिन, इस्ट्रोजेन इत्यादी शरीरातील विविध हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. 

  • डोळ्यांचे आरोग्य


जर एखादी व्यक्ती दररोज न्युजपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ खात असेल तर त्याची दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. न्युजपेपरच्या शाईमध्ये असलेले विषारी पदार्थ डोळ्यांना हानी पोहोचवतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांच्या डोळ्यांना याचा अधिक परिणाम होतो. 

  • कॅन्सर

न्युजपेपरच्या शाईमध्ये आयसोप्रोपाइल फॅथलेट, डायने आयसोप्रोपायलेट इत्यादी अनेक घातक रासायनिक पदार्थ आढळतात. जेव्हा आपण गरम अन्न वर्तमानपत्रात ठेवतो तेव्हा ही शाई अन्नाला चिकटते. या शाईमुळे आपल्या शरीराची मोठी हानी होते. ही रसायने आपल्याला कर्करोगासारखे घातक आजारही देऊ शकतात. म्हणूनच कधीही गरम खाद्यपदार्थ न्युजपेपरमध्ये ठेवणे टाळावे. 

  • पोटासंबंधित आजार


न्युजपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने पचनाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. न्युजपेपरचा कागद पचनसंस्थेसाठी योग्य नाही. न्युजपेपरची शाई व इतर रसायने पोटात जाऊन पचनक्रिया बिघडवतात. त्यामुळे पोटात जळजळ, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात. न्युजपेपरमधील खाद्यपदार्थ जास्त वेळ खाल्ल्याने पचनसंस्था कमजोर होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी न्युजपेपरमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com