जेवणात कोशिंबीर (Salad) असेल तर जेवण संपूर्ण होते. तसेच हे खायला (Tasty) असून आरोग्य निरोगी (healthy) राहते. आपण नेहमीच विविध प्रकारचे कोशिंबीर (Salad) बनवू शकतो. यासाठी तुम्ही स्वयंपाक घरातील विविध पदार्थ वापरू शकता. जुनऊ घेऊया कोणत्या मार्गांनी आपण कोशिंबीर (Salad) बनवू शकतो.
राजमा सॅलड: तुम्हाला जर राजमा आवडत असेल तर तुम्ही कोशिंबीरमध्ये (salad) राजमा टाकु शकता. यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच हे कोशिंबीरचवदार देखील असते. तुम्ही ही कोशिंबीर (salad) दुपारच्या जेवणात तसेच रात्री जेवणानंतर देखील खाऊ शकतात. यासाठी आपल्याला 1/2 कप उकडलेला राजमा, 1/2 उकडलेला हरभरा, 1 कांदा, 1 कप कोबी, एक छोटा चमचा निंबू रस, 1 चमचा छत मसाला, 2 चमचा चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आवश्यक असेल.
* कसे बनवायला
सर्वात पहिले राजमा उकळून घ्यावा. नंतर एक भांड्यात राजमा कडून घ्यावे. नंतर यात बारीक कापलेला कांदा, कोबी टाकावी. यात थोडी कोथिंबीर, मीठ, चाट मसाला आणि लिंबू रस टाकावे. सर्व पदार्थ चांगले मिक्स करावे. तयार आहे तुमचा राजमा सॅलड. पोषक आणि पौष्टिक असा राजमा सॅलड (salad) आरोग्य निरोगी रखण्यास मदत करते.
* फळ आणि अक्रोडची कोशिंबीर
फळ आणि अक्रोड हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यस लाभदायी आहे. यापासून बनवलेली कोशिंबीर (salad) खाल्ल्यानंतर तुम्हाला बऱ्याचवेळ भूक लागत नाही. तुम्ही तुमच्या आवडीची फळ घेऊ शकता तसेच सुकामेवा टाकून पौष्टिक कोशिंबीर (salad) तयार करू शकता. ही कोशिंबीर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी खाऊ शकता. हे आपल्या शरीराला पोषण देते. हे सॅलड तयार करण्यासाठी 1 केळी, 1 सफरचंद, 6 स्ट्रॉबेरी, 1 किवी, 1 चमचा मध, 10 बदाम, 10 अक्रोड, 10 मनुका आणि 2 चमचे भोपळा बी नक्की घ्यावे.
* कसे तयार करावे
सर्व फळांचे बारीक तुकडे करून घ्यावे. एक भांड्यात घेऊन बदाम,अक्रोड, मनुका आणि भोपळाबी घालावी. सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यावे. त्यात नंतर एक चमचा मध टाकावे. तयार आहे फळांचे आणि अक्रोडचे सॅलड (salad) . खायला चवदार आणि पौष्टिक असे सॅलड आरोग्याला फायद्याचे ठरते.
* मोट आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर
वजन कमी करण्यासाठी तुम्ही या कोशिंबीरचे (salad) आहारात सेवन करू शकता. यासाठी मोड आलेले मुगाची डाळ घ्यावी. यात मुबलक प्रमाणात प्रोटिन असते. यात कॅलरीचे प्रमाण कमी असते. यामुळे हे वजन कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी आपल्याला 1 कप मोड आलेले मग डाळ, 1 कांदा, 1 काकडी, 1 टोमॅटो 1 चमचा लिंबाचा रस, अर्ध चमचा मिरपूड पावडर, छत मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यावे.
* कसे तयार करावे
मोड आलेले मग डाळ प्रेशर कुकरमध्ये घेऊन शिट्टी करून घ्यावी. नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. शिजवलेल्या अंकुराना थंड पाण्यात धुवावे. एका भांड्यात स्प्राउट्स एकत्र करावे. यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस मिरपूड पावडर , चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे. असा प्रकारे तयार आहे तुमची कोशिंबीर. खायला चवदार आणि पौष्टिक अशी कोशिंबीर (salad) आरोग्यस लाभदायी ठरते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.