Healthy And Happy Life: घर अन् ऑफिस दोन्ही सांभाळताय? मग निरोगी राहण्यासाठी 'या' टिप्सची घ्या मदत

Healthy And Happy Life Women: जर तुम्ही एकाच वेळी घर आणि ऑफिस सांभाळत असाल आणि या सगळ्यामध्ये तुमच्या आरोग्यासाठी वेळ नसेल तर पुढील गोष्टी करू शकता.
Healthy And Happy Life:
Healthy And Happy Life: Dainik Gomantak

healthy and happy life for women take care of health

आजकाल महिला केवळ घरच नाही तर ऑफिस देखील उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. महिलांच्या डोक्यावर एक नाही तर अनेक जबाबदाऱ्या असतात. कुटुंबाची काळजी घेणे, मुलांची काळजी घेणे, करियर करणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे. त्यामुळे स्त्रिया मल्टीटास्किंगमध्ये निपुण आहेत. 

मात्र या सगळ्यात महिलांना स्वत:साठी वेळ काढता येत नाही आणि याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी निरोगी राहणे हे अधिक कठीण काम आहे, कारण घर आणि घराबाहेरच्या गर्दीत त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.

जर तुम्ही एकाच वेळी घर आणि ऑफिस सांभाळत असाल आणि या सगळ्यामध्ये तुमच्या आरोग्यासाठी वेळ काढणे तुम्हाला अवघड जात असेल पुढील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळी नाश्ता करा

नोकरी करणाऱ्या महिला अनेकदा ही चूक करतात. घरातील सर्व कामे उरकून, रिकाम्या पोटी ऑफिसला जातात आणि मग लगेच जेवण करतात. पण प्रत्यक्षात त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे पोट भरलेले राहते आणि तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. प्रथिने युक्त नाश्ता करणे गरजेचे आहे. 

भरपुर पाणी प्या

दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे फार महत्वाचे आहे. अनेकदा महिला याकडे लक्ष देत नाहीत. परंतु शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे. घर आणि ऑफिसच्या कामाच्या दरम्यान 7-8 ग्लास पाणी प्यावे. तुम्ही दिवसभर डिटॉक्स पाणी किंवा कोमट पाणी देखील पिऊ शकता. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

योगा करा

ऑफिस आणि घरातील कामांमध्ये योगासन किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर चालायला जावे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा काही तासांनंतर उठून थोडा वेळ चालावे. लिफ्टच्या ऐवजी पायऱ्यांचा वापर करावा आणि डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी थोडा वेळ काढून डोळ्यांचा व्यायाम करावा.

फळं खा

अनेकदा घर, कुटुंब आणि ऑफिस सांभाळताना महिलांना योग्य आहार घेता येत नाही. नोकरी करणाऱ्या महिला ऑफिसमध्ये बराच वेळ घालवतात. अशावेळी एखादे फळं सोबत ठेवावे. दिवसातून एक फळ नक्की खावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com