Weight Loss: आता वयाच्या 40 व्या वर्षीही कमी करता येईल वजन

वजन कमी करणे कोणत्याही वयात सोपे नसते तसेच चाळीशीनतंर वजन कमी करणे अधिक अवघड होते.
Weight Loss
Weight LossDainik Gomantak
Published on
Updated on

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण वजन कमी करणे सोपे नाही. पण 40 वर्षांनंतर वजन कमी करणे कठीण होते. या वयात पचनसंस्था मंदावते आणि वजन कमी होण्याऐवजी ते वाढू लागते. यामुळेच वयाच्या 40 व्या वर्षीही 30 व्या वर्षी जसा आहार घेतला जातो. तसाच आहार घ्यावा, असे सांगितले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 40 व्या वर्षी कोणतीही व्यक्ती अधिक हुशार, अनुभवी आणि आत्मविश्वासी बनते. पण या वयात पचनक्रिया मंदावते आणि वजन कमी करणे कठीण होते. पण हवे असेल तर या वयातही वजन सहज कमी करता येऊ शकते. कसे ते जाणून घेऊया.

  • योग्य आहार

कार्ब आपल्या शरीरात इंधनाचे काम करते. आहारातून ते काढून टाकल्यास बद्धकोष्ठता, थकवा आणि चिडचिड यासारख्या समस्या उद्भवू शकतात. वयाच्या 40 नंतर, दररोज कार्बोहायड्रेटची आवश्यकता कमी होते. त्यामुळे आहारातून कार्ब पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी ते कमी करा. एका महिलेला दररोज 40 ते 50 ग्रॅम कार्बोहायड्रेटची आवश्यकता असू शकते. एक चपाती किंवा भात, बीन्स, डाळी आणि कोशिंबीर यांचा आहारात समावेश करता येईल. अशा आहारामुळे चयापचय वाढेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

  • योग्य वेळेत पुरेसा आराम

आजकाल कामामुळे ताण वाढू लागला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली तर त्याचे स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होऊ शकतात. तणावामुळे वजन वाढू शकते. वयाच्या 40 नंतर शरीरातील चयापचय वाढविण्यासाठी, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असाल योग्य आराम घेणे गरजेचे आहे.

Weight Loss
Calcium Rich Foods: ‘हे’ पदार्थ शरीरातील कॅल्शियमची कमतरता करतील पूर्ण
  • रोजच्या आहारात भाज्यांचा समावेश करा

वयाच्या चाळीशीनंतर काही लोक खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. सर्व प्रकारच्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. आहारात जास्त भाज्या घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिनची पातळी आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते. दररोजच्या आहारात दोन ते तीन हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

  • चांगली झोप कशी टाळायची

तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी वजन कमी करायचे असेल तर चांगली झोप तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा झोपेचा दिनक्रम बदला आणि सर्वात पहिले झोपण्याची वेळ निश्चित करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com