Dry Cough Remedies : कोरड्या खोकल्यापासून होईल सुटका! वापरा हे घरगुती उपाय

या वातावरणात अनेकांना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो.
Natural Tips For Dry Cough
Natural Tips For Dry CoughDainik Gomantak
Published on
Updated on

हिवाळा सुरू झाला आहे. देशाच्या अनेक भागात थंडी अजूनही लोकांना त्रास देत आहे. हिवाळ्यात अनेकांना थंडी आणि सर्दीची समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात लोक वारंवार आजारी पडतात. या वातावरणात अनेकांना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. यावर घरगुती उत्तम उपाय कोणते हे जाणून घेऊया. (Natural Tips For Dry Cough)

Natural Tips For Dry Cough
Daily Horoscope 16 December : वृषभ राशीचे लोक शत्रूवर करतील मात; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
  • काळी मिरी आणि मध

काळी मिरी आणि मध एकत्र सेवन केल्याने कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळते. यासाठी तुम्ही 5 काळी मिरी घेवून पावडर बनवा आणि यात मध टाकून मिक्स करावे. नंतर याचे सेवन करावे. यावर पाणी पिणे टाळावे. याचे रोज सेवन केल्यास तुमचा कोरडा खोकला कमी होऊ शकतो.

  • आले आणि मीठ

आल्याचा छोटा तुकडा घेऊन त्यावर चिमूटभर काळे मीठ टाकावे आणि त्याचे सेवन करावे. दिवसातून एकदा याचे सेवा करावे. असे केल्याने तुमचा कोरडा खोकला काहीच दिवसात कमी होऊ शकतो.

  • कोमट पाण्यात मधाचे सेवन

कोरडा खोकला लवकर बरा करायचा असेल तर कोमट पाण्यात मध टाकून त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यासाठी रोज झोपताना कोमट पाण्यात मध टाकून सेवन केल्यास घसा दुखणे कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com