Ayurvedic Medicines: 'असे' आहेत आयुर्वेदाच्या औषधनिर्मितीचे प्रकार, जाणून घ्या ही विशेष माहिती..

Ayurvedic Medicines: वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात.
Ayurvedic Medicines
Ayurvedic MedicinesDainik Gomantak
Published on
Updated on

Ayurvedic treatment methods and medicines:-

आयुर्वेदाला सुमारे हजारोवर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. अशा आयुर्वेदामध्ये मराठी कालगणनेनुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतुंमध्य विभागणी केलेली आहे.

त्या त्या ऋतुंमधील होणाऱ्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात.

आयुर्वेदामध्ये औषधी स्वरूपात आसव-अरिष्ट, काढा, चूर्ण, चाटण/लेह असे बरेच प्रकार आढळून येतात. या संबंधीची माहिती अगदी थोड्या स्वरूपात...

आसव-अरिष्ट:-

आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात.

त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते.

संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात.

औषधी वनस्पतींचे भरड चूर्ण करून त्यापासून काढा बनवून त्यानंतर वरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रव पदार्थ तयार होतो, त्यास अरिष्ट असे म्हणतात.

आसव बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते.

आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते;

तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते.

वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.

Ayurvedic Medicines
Goa Congress: तवडकर यांची 'सभापती' न होता 'पक्षपाती' बनून कामगिरी- काँग्रेसचा आरोप

काढा:-

ज्या पदार्थांचा काढा करावयाचा असेल ते घटकपदार्थ घेतात व त्यावर पदार्थांच्या वजनाच्या 16 पट पाणी घालून ते पाणी एक अष्टमांश (1/8) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळवताtत, हे पाणी गाळून घेतल्यावर बनलेल्या द्रवपदार्थाला त्या घटकपदार्थातील मुख्य घटकाचा काढा म्हणतात..

घनवटी:-

यात औषधाची पूड करून मग त्यात पातळ पदार्थ जसे पाणी, तूप इत्यादी मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यालाच घनवटी/वटी (गोळ्या ) असे म्हणतात.

चूर्ण:-

चूर्ण म्हणजे त्या वनस्पतीला / तिच्या सालीला/फळाला वाळवून नंतर त्याला कुटून बारीक करणे. (चूर्ण करणे) हे चूर्ण पाणी, तूप, मध किंवा गुळासोबत औषध म्हणून घेतात.

Ayurvedic Medicines
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली, आणखी एका मंत्र्याला करावा लागणार मंत्रीपदाचा त्याग

चाटण/लेह:-

पुष्कळ औषधी उगाळून किंवा कुटून चाटण्यासाठी जे गोड रसायन बनवितात ते; लेह; चाटण्याचे औषध

प्राश:-

प्राशन करण्यासाठी बनविलेले गोड व घन आयुर्वेदिक रसायन. च्यवनऋषींने बनवले ते च्यवनप्राश. असेच कवचप्राश, कफप्राश, केशरी बदाम प्राश, त्रिफळाप्राश, त्रिफला पंचकोल प्राश, बदामप्राश, शिलाजितप्राश, सुवर्णप्राश, वगैरे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com