Health Care: डायबिटिज बर्नआउट म्हणजे काय? 'ही' लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

अनेक लोक डायबिटिज बर्नआउट या आजाराला बळी पडतात. यापासून कसा बचाव करावा हे जाणून घेऊया.
Diabetes Diet
Diabetes DietDainik Gomantak

health care what is burnout diabetes read symptoms and remedies

आजकालची वाईट जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मधुमेह हा एक आजार आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे नाहीसा होऊ शकत नाही, तो आहार आणि जीवनशैली सुधारूनच नियंत्रणात ठेवता येतो. शुगर लेवर वाढल्याने मधुमेहाच्या रुग्णांना इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मधुमेहावर उपचार न केल्यामुळे, अनेक लोक मधुमेह बर्नआउटचे बळी ठरतात. चला जाणून घेऊया डायबिटीज बर्नआउट म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय आहेत.

  • डायबिटीज बर्नआउट म्हणजे काय

डायबिटीज बर्नआउट ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रुग्णाला भावनिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. खरं तर, मधुमेहाच्या बाबतीत, रुग्णाला रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी नियमित तपासणी करावी लागते. तसेच आहारातही बरेच बदल करावे लागतात. एवढेच नाही तर यामुळे व्यक्तीला आरोग्याच्या काही समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी मधुमेही रुग्णांना अनेकदा निराशा, चिंता आणि थकवा जाणवू लागतो. या स्थितीला मधुमेह बर्नआउट म्हणतात.

  • डायबिटिज बर्नआउटची लक्षणे कोणती?

- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीतील बदलांकडे दुर्लक्ष करणे

- व्यक्तीला भावनिक थकवा जाणवतो.

- रुग्णाच्या मनःस्थितीत बदल आणि चिडचिड होऊ शकते.

याशिवाय, अशा स्थितीत व्यक्ती समाजापासून दुरावू लागते.

- ब्लड शुगर लेवलमध्ये बदल होतो.

- तणाव आणि भावनिक दबावामुळे ब्लड शुगरमध्ये चढ-उतार

  • डायबिटीज बर्नआउटपासून कसा बचाव करावा

एखाद्याने आपले विचार कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर केले पाहिजेत. कारण अशा परिस्थितीत सपोर्ट सिस्टीम खूप महत्त्वाचे असते.

याशिवाय मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये छोटे-मोठे बदल करावे लागेल. जर तुम्हाला शुगर लेवल कंट्रोल करायची असेल तर काही नियम देखील पाळावे लागतील.

यासारखे उपाय केल्याने तुम्हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल. याशिवाय मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात आवश्यक ते बदल करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. तसेच, औषधांचा डोस कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता. कारण अशावेळी डॉक्टर रुग्णाच्या स्थितीनुसार योग्य सल्ला देतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com