Kokum Benefits: गोव्याच्या पाककृतीतील महत्वाचा घटक असलेल्या 'सोल'चे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Kokum Benefits: नारळानंतर सोल (कोकम) गोव्यातील पाककृतीतील महत्त्वाचा घटक आहे.
Kokum Benefits:
Kokum Benefits:Dainik Goma

Kokum Benefits: गोव्याच्या पाककृतीतील सोल (कोकम) का वापरतात हे आहेत आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही सुध्दा सोलाचा वापर नक्की कराल! नारळानंतर सोल (कोकम) गोव्यातील पाककृतीतील महत्त्वाचा घटक आहे.

Kokum Benefits:
Black Pepper Farming: गोव्याचे वातावरण ठरते काळी मिरीसाठी योग्य, जाणून घ्या कशी केली जाते लागवड

सोलाशिवाय व्हेज किंवा नॉनव्हेज डिश त्यांची तयारच होत नाही. गोमंतकीय लोकांची सोलकढी हे थंडवर्धक पेय हे जणून त्यांच्यासाठी पूर्णान्नच. गोव्याच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये उन्हाळ्यात ताजे कोकम उपलब्ध असते.

पण नेहमीच वाळलेले कोकम, किंवा आगळ आपल्याला स्थानिक बाजारपेठेत मिळू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पारंपारिक औषधांत सोला (कोकमा)चा वापर केला जातो. याच सोलाचे आरोग्यासाठी असणारे फायदे काय हे जाणून घ्या.

पचनास गुणकारी -

पचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना कोकम लाभदायक ठरते. रोज १ कोकम खाल्ल्याने जुलाब आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांना दूर ठेवता येते.

Kokum Benefits:
Winter Care Tips: यंदाच्या हिवाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी

वजन कमी होते

कोकममध्ये हायड्रॉक्सीसायट्रिक ॲसिड चरबी कमी करण्यास मदत करते. या अतिरिक्त कॅलरीज चरबीत रूपांतरित झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पोषकद्रव्याचे प्रमाण अधिक असते.

कोकमात मॅलिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड आणि कार्ब, बी-व्हिटॅमिनचे, ॲस्कॉर्बिक ॲसिड, मॅंगनीज, पोटॅशियम फायबर आणि गार्सिनॉल ही आरोग्यदायी पोषकद्रव्ये आपल्याला समृद्ध बनवतात.

त्वचेसाठी लाभदायी -

त्वचेवर येणारे रॅशेस, जळजळ, पुरळ व ॲलर्जी यासाठी कोकम लावले तर त्वचेवर होणारा दाह कमी करण्यास मदत करते. कोरड्या त्वचेसाठी, ओठांचा अल्सर, पायांवरील भेगा दूर आदीसाठी कोकम गुणकारी ठरते.

टॉनिक -

कोकमचा रस शरीरातील उष्णता व पित्त कमी करण्यास मदत करते. हे शरीरातील लिपिडचे ऑक्सिडेटिव्ह अधःपतन कमी करते. लिव्हर खराब करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विषारी रसायनांपासून संरक्षण करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com