Bel Patra Che Fayde: पचनशक्ती वाढवण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यापर्यंत, शंकराचे आवडते बेलपत्र आरोग्यदायी

Health Benefits Of Beal Leaf: महादेवाला बेलाचे पान आणि फुळ अर्पण करणे शुभ मानले जाते. कारण भगवान शंकराला या गोष्टी प्रिय आहे. तसेच याचे सेवन करणे आरोग्यदायी असते.
Bel Patra Che Fayde (Benefits Of Beal Leaf in Marathi)
Bel Patra Che Fayde (Benefits Of Beal Leaf in Marathi)Dainik Gomantak

Bel Patra Che Fayde

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलाचे पान अर्पण करण्यामागे मोठी श्रद्धा आहे. या पानांशिवाय या भगवान शंकराची पूजा पूर्ण होत नाही. हे केवळ पूजेमध्येच आवश्यक नाही, तर ही पाने इतकी फायदेशीर आहेत की ते तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवते.

पचन सुरळित ठेवते

ज्या लोकांना पोटासंबंधित किंवा पचनाशी संबंधित समस्या असेल तर त्यांच्यासाठी बेलाचे पान हे औषधापेक्षा कमी नाही. यासाठी तुम्ही बेलाचे पाने पाण्यात उकळून पिऊ शकता किंवा त्यांना बारीक करून किंवा चावून खाऊ शकता. यामध्ये असलेले पोषक घटक पोटासंबंधित समस्या दूर ठेवताता.

कोलेस्ट्रॉल कमी करते

वाईट कोलेस्ट्रॉलपासून ते हृदयापर्यंत अनेक आजारांमध्ये बेलाचे पान खूप फायदेशीर आहे. या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात खूप मदत करतात.

मधुमेह

मधुमेह असणाऱ्या लोकांनी बेलाचे कवळे पान खावे. त्यात मुबलक प्रमाणात फायबर आणि लॅक्सटिव गुणधर्म आहेत. जे तुमचे इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले बेलाचे पान तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. चेहऱ्यावरचे मुरुम कमी करण्यास मदत करते. हे वापरताना बेलाची पानं बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला केसांची मजबत हवे असेल तर तुम्ही ही पेस्ट लावून केस स्वच्छ पाण्याने धुवू शकता. यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या कमी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com