Health Benefits of Garlic: हिवाळ्यात होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजरांपासून शरीराला 'अशा' प्रकारे ठेवा दूर

लसूण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहारात लसूण खावे.
Garlic
GarlicDainik Gomantak
Published on
Updated on

Health Benefits of Garlic: हिवाळ्यात लसुण खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसणाचे सेवन केल्याने शरीराला होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजरांपासून वाचवतो. लसूणमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. ते अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.

लसणाचा वापर लोक भाजीमध्ये करतात. लसणाचे पाणी पिल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. लसुण सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ति वाढण्यास मदत होते.

तसेच लसुण मध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-व्हायरलसह, असे गुणधर्म आढळून येतात. नियमितपणे लसणाचे सेवन केल्याने शरीराला होणाऱ्या संसर्गापासून बचाव होतो.

Garlic
Tiger Reserve Project: व्याघ्र क्षेत्र सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब
  • हिवाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी लसुण सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि आपले हृदय देखील निरोगी राहते.

  • लसूण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. मधुमेहाच्या रुग्णांनी रोजच्या आहारात लसूण खावे.

  • एकदा वजन वाढले की ते नियंत्रणात आणणे कठीण होऊन जाते. जर तुम्ही लसूण भाजून सेवन केला तर तुमचे नक्की वजन नियंत्रणात राहील. लसूण शरीरातील फॅट्सचे प्रमाण कमी करते, आणि शरीराला पोषक घटक देण्यास मदत करते. वजन जर नियंत्रणात असेल तर आजाराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

  • नियमितपणे लसूण सेवन केल्याने मधुमेहामुळे होणारे आजार आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत करते.

  • शरीराला कोणत्याही प्रकारची जर ऍलर्जी होत असेल तर तुम्ही लसूण वापरू शकता. कारण लसणात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावरील ऍलर्जी कमी होण्यास मदत होते. दरोरोज लसूण खाल्याने शरीरावरील ऍलर्जी आणि त्वचेवरील पुरळ देखील कमी होते.

  • शरीरातील रक्ताची कमतरता असल्यामुळे लसूण खूप फायदेशीर ठरतो. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते.

  • रक्त पातळ होऊन रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी लसणाचे नियमितपणे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com