Harley-Davidson भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त बाईक; एवढ्या किंमतीत गोव्यातील ताजमध्ये सहा दिवस राहता येईल

Harley Davidson X440 Bookings: Harley-Davidson ने Hero MotoCorp च्या सहकार्याने बनवलेल्या बहुप्रतिक्षित मोटारसायकलचे बुकिंग सुरु झाले आहे.
Harley Davidson X440
Harley Davidson X440Dainik Gomantak
Published on
Updated on

Harley Davidson X440 Bookings: Harley-Davidson ने Hero MotoCorp च्या सहकार्याने बनवलेल्या बहुप्रतिक्षित मोटारसायकलचे बुकिंग सुरु झाले आहे. कंपनीने अलीकडेच आपली पहिली मेड-इन-इंडिया बाईक, Harley Davidson X440 चे अनावरण केले. ही बाईक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते, ज्यासाठी बुकिंग रक्कम म्हणून 25,000 रुपये जमा करावे लागतील. भारतीय बाजारपेठेत हार्लेने ऑफर केलेली ही सर्वात स्वस्त बाईक असेल आणि 3 जुलै रोजी अधिकृतपणे लॉन्च केली जाईल.

डीलरशिपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी ही बाईक लॉन्च झाल्यानंतरच त्याची किंमत कळेल. अशी शक्यता आहे की, कंपनी ती 2.5 लाख ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान विक्रीसाठी लॉन्च करेल. त्याची डिलिव्हरी या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून सुरु होऊ शकते, तथापि याबद्दल अधिक माहिती बाइकच्या लॉन्चच्या वेळीच दिली जाईल.

Harley Davidson X440
World Motorcycle Day 2023: पावसाळ्यात प्रवास सुखकर करायचा असेल तर बाईकची घ्या अशी काळजी

हार्ले डेव्हिडसन X440

दुसरीकडे, ही पहिली Harley-Davidson बाईक आहे, जी पूर्णपणे भारतात बनलेली आहे. याशिवाय, हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या भागीदारीत तयार केलेले हे पहिले मॉडेल आहे. अर्गोनॉमिक्सबद्दल सांगायचे झाल्यास, हे कोणत्याही फॉरवर्ड-सेट फूटपेगशिवाय किंवा स्वीप्ट बॅक हँडलबारशिवाय ऑफर केले जाते, जे तुम्ही क्रूझरवर पाहता. त्याऐवजी कंपनीने या बाइकमध्ये मिड-सेट फूटपेग आणि फ्लॅट हँडलबार दिला आहे. पण या बाईकचा लुक खूपच स्पोर्टी आहे.

तसेच, बाइकच्या स्टाइलिंगचे काम हार्ले-डेव्हिडसनने केले आहे, तर इंजिनिअरिंग, टेस्ट आणि डेव्हल्पिंग हीरो मोटोकॉर्प करत आहे. ती स्टायलिश बाइकसारखी दिसते, ज्यामध्ये हार्लेचा डीएनए आहे. कंपनीने या बाइकमध्ये डे-टाइम-रनिंग (डीआरएल) लाइट्स वापरल्या आहेत, ज्यावर 'हार्ले-डेविडसन' असे लिहिले आहे.

Harley Davidson X440
World Motorcycle Day 2023: बाईकवर लांबचा प्रवास करताय, मग 'या' गोष्टी सोबत ठेवाच

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:

हार्ले डेव्हिडसन ही पहिली बाईक आहे, जी पूर्णपणे भारतात बनलेली आहे.

3 जुलै रोजी अधिकृतपणे लॉन्च केले जाईल.

बुकिंगसाठी बुकिंग रक्कम म्हणून 25,000 रुपये भरावे लागतील.

Harley Davidson X440 ची डिलिव्हरी येत्या सप्टेंबरपासून सुरु होऊ शकते.

पॉवर आणि परफॉर्मेन्स

Harley-Davidson X440 ला आधुनिक-रेट्रो लुक देण्यात आला आहे. कंपनीने या बाईकमध्ये नवीन 440 cc सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 30-35 bhp पॉवर जनरेट करेल. हे 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडले जाईल आणि मानक म्हणून स्लिपर क्लच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com