New Year 2024: देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागतं करण्यात येत आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. देशभरात नागरिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करून 2024 चे स्वागत केले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, लोक वर्षाचा पहिला दिवस खास करण्यासाठी मंदिर, मस्जिद आणि चर्चेमध्ये गर्दी करत असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने शेअर केला आहे.
दिल्लीच्या झंडेवालान देवी मंदिरात नवीन वर्षानिमित्त आरती करण्यात आली.
तामिळनाडू येथे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रामेश्वरममधील चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आल्या.
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने नववर्षानिमित्त भगवान तिरुपती बालाजीचे मंदिर सुंदर फुलांनी सजवले आहे. मंदिररची सजावट पाहण्यासारखी आहे.
अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरातही वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी देवासमोर नतमस्तक होऊन त्याला शुभेच्छा दिल्या.
उत्तर प्रदेशमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी नदी किनारी पुजाकरण्यात आली . हे नयनरम्य दृश्य हजारो भाविकांनी पाहिले.
नवीन वर्षानिमित्त मीनाक्षी अम्मान मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.
तामिळनाडूतील वेलंकन्नी चर्चमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.
नव वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुवल्लूर येथील तिरुट्टानी अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिरात विशेष महाआरती करण्यात आली.
नव वर्षाच्या पहिल्या दिवशी गीर सोमनाथ येथील सोमनाथ मंदिरात विशेष आरती करण्यात आली.
अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरातही वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी देवासमोर नतमस्तक होऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांनी नवीन वर्षाची सुरुवात होताच सुवर्ण मंदिरात प्रार्थना केली.
केरळमधील सन्निधानम सबरीमाला मंदिर पुन्हा उघडल्यावर नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.