Hand Tremors: तुमचेही हात थरथरता, वेळीच व्हा सावध, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

Hand Tremors Treatment: अनेक लोकांना हात थरथरण्याची समस्या असते. पण याकडे दुर्लक्ष करतात. हाताचा थरकाप होण्याची अनेक कारणे आहेत.
Hand Tremors
Hand TremorsDainik Gomantak

hand tremors causes symptoms know about treatment read full story

अनेक लोकांना हात थरथरण्याची समस्या असते. ही एक सामान्य प्रक्रिया नाही परंतु कधीकधी ती मानसिक कारणांमुळे देखील होते. उदाहरणार्थ, चिंताग्रस्तपणा आणि भीतीमुळे हात आणि पाय थरथरतात. परंतु काहीवेळा हे काही रोगांचे कारण देखील असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका. या समस्येमागे कोणती कारणे आहेत आणि ते कसे थांबवता येतील हे जाणून घेऊया.

अनेक लोकांना हात थरथरण्याची समस्या असते. ही एक सामान्य प्रक्रिया नाही परंतु कधीकधी ती मानसिक कारणांमुळे देखील होते. उदाहरणार्थ, चिंताग्रस्तपणा आणि भीतीमुळे हात आणि पाय थरथरतात. परंतु काहीवेळा हे काही रोगांचे कारण देखील असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका. या समस्येमागे कोणती कारणे आहेत आणि ते कसे थांबवता येतील हे जाणून घेऊया.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही माणसातील अशा समस्या मेंदूच्या कार्यप्रणालीशी संबंधित असतात आणि जेव्हा शरीरातील काही पेशी कोणत्याही दुखापतीमुळे किंवा आजारामुळे काम करणे थांबवतात, तेव्हा रुग्णामध्ये या समस्या सुरू होतात. अशावेळी या समस्येची वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे पार्किन्सन्स आजारात त्याचे रूपांतर होऊ शकते.

पार्किन्सन्स हा एक आजार आहे. यामध्ये मेंदूच्या नसा खराब होऊ लागतात आणि नसा कमकुवत होऊन तुटायला लागतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा आजार शरीराच्या त्या सर्व भागांना प्रभावित करतो जे मज्जासंस्था किंवा मज्जातंतूंद्वारे नियंत्रित असतात. वयानुसार पार्किन्सन रोगाचा धोका वाढतो.

कोणते उपाय करावे?

  • ध्यान

या समस्या दूर करण्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे. या प्रकारचे ध्यान श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करते. याचा दररोज सराव केल्याने तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते आणि हातांची थरथर थांबते.

  • व्हिटॅमिन बी 12 वाढवा

आरोग्य तज्ञांच्या मते ही समस्या टाळण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 चे सेवन शक्य तितक्या लवकर सुरू केले पाहिजे. यामुळे शरीरातील सुन्नपणा, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. यासाठी आहारात दुध, दही, पनीर यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.

  • व्यायाम करा

हा पार्किन्सन्सचा आजार कमी वयात डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरीने बरा होऊ शकतो. याशिवाय दररोज व्यायाम केल्याने पार्किन्सन्सचा धोकाही कमी होण्यास मदत होते. पार्किन्सन्सच्या समस्येचे निदान करण्यासाठी तुम्ही डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे जाऊ शकता. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधं घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com