Hair Fall: 'या' सवयींमुळे वाढू शकते केस गळण्याची समस्या

तुमच्या वाईट सवयींमुळे केस गळतीची समस्या वाढू शकते.
Hair Fall reasons
Hair Fall reasons Dainik Gomantak

Hair Fall: केस घनदाट आणि मजबुत असावे असे सरवांनाच वाटते. यासाठी अनेक ब्युटी प्रोडक्टचा देखील वापर केला जातो. पण याचा काही रिझल्ट दिसत नाही.

तसेच अनेक लोक केस स्टायलिश दिसण्यासाठी हेअर ड्रायर, स्ट्रेटनर सारखे इलेक्टिक प्रोडक्टचा वापर करतात. यामुळे केस जास्त गळतात. केसांची काळजी घेताना नकळतपणे आपण अनेक चुका करतो ज्यामुळे केस गळू लागतात.

  • कोणत्या चुका करतो?

अनेक लोक आठवड्यातून एकदाच केस शॅम्पूने धुतात.पण केसांमध्ये घाण असेल तर केस जास्त गळतात. उन्हाळ्यामध्ये केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यामुळे आठवड्यातून तीन वेळा केस दुवावे.

Hair Fall reasons
Relationship Tips: रिलेशनशिप वाटू लागलंय बोर? पूर्वीसारखं प्रेम परत मिळवण्यासाठी ट्राय करा या टिप्स

अनेक लोक केसांना स्टायलिश बनवण्यासाठी कॅरोटीन करतात. यामुळे केस काही दिवस चमकदार आणि स्टायलिश दिसतात. पण यामुळे केस दूप्पट गळू लागतात.

यामध्ये केमिकलचा वापर केला जातो. यामुळे केसांमधील नैसर्गिक चमक आणि पोषण निघुण जाते.

  • केसांना नैसर्गिकरित्या चमकदार कसे ठेवावे?

केसांना नैसर्गिकरित्या चमकदार ठेवायचे असेल तर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज करावी.

जवस,तांदुळ, कडीपत्ता हे पाण्यात उकळून केसांना लावावे.यामुळे केस चमकदार होतात.

मेथी दाणा पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. नंतर सकाळी ते पाणी केसांना लावावे. यामुळे मजबुत होतात आणि गळणे बंद होतात.

लिंबू, कोरफड किंवा दही यांसारख्या पदार्थांपासून बनवलेले हेअर मास्क लावावे. यामुळे केस गळती कमी होते.

असे आठवड्यातून दोनदा केल्यास केस गळतीची समस्या कमी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com