Hair Care Tips: हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर आणि केसांवर देखील परिणाम होतो. थंडीला सुरूवात झाली असुन केसांसंबंधित समस्या निर्माण होतात. जसे की केस गळणे, कोंडा होणे, फाटे फुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. केसांची योग्य काळजी न घेतल्यास केस गळु शकतात. केस चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी पुढील गोष्टींचे पालन करावे.
सौम्य शॅम्पू
केसांसाठी नेहमी सौम्य शॅम्पू वापरणे खूप फायदेशीर आहे. हे केसांमधला कोरडेपणा दूर करते आणि मुळांपासून मजबूत करते. तसेच कोंड्यांची समस्या कमी करते. या ऋतूत चुकूनही रसायनयुक्त शॅम्पू वापरू नका. त्याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर होतो. केसांना मुळापासून कमकुवत करते. त्यामुळे केस गळणे सुरू होते.
केसांची मसाज करावी
बदलत्या हवामानात शरीरापासून केसांपर्यंत पोषणाचा अभाव जाणवतो. केस कोरडे आणि कमकुवत होऊ लागतात. अशावेळी केसांना यापासून वाचवण्यासाठी तेलाचा वापर करा आणि नियमित मसाज करावी. मसाज केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे केसांची वाढ लवकर होते. जसजसे केस वाढतात तसतसे ते मुळांपासून मजबूत आणि चमकदार बनतात. केसांना तेल लावणे गरजेचे आहे. यामुळे कोरडेपणा येत नाही तसेच मुळांमध्ये ओलावा टिकून राहतो.
डीप कंडिशनिंग करा
बदलत्या हवामानात केसांचे डीप कंडिशनिंग करणे गरजेचे आहे. यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. हे केस आणि टाळूवरील कोरडेपणा दूर करते. यामुळे केसांची चमक वाढते. हे केसांना मॉइश्चरायझ आणि सुंदर बनवण्यास मदत करते.
गरम पाण्याचा वापर टाळावा
हिवाळात अनेक लोक गरम पाण्याने आंघोळ करण्याबरोबरच केस गरम पाण्याने धुतात. असे केल्याने केसांचे नुकसान होते. या ऋतूत केस गरम पाण्याने धुवू नयेत. यासाठी केसांना फक्त कोमट पाणी वापरावे.
इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळावा
केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी हेअर स्टाइलिंग टूल्स वापरणे टाळावे. इलेक्ट्रिक उपकरणामुळे केस खराब होतात. त्यामुळे केस तुटण्याची समस्या सुरू होते. एवढेच नाही तर केस कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्ही अधूनमधून तुमच्या केसांना इलेक्ट्रिक उपकरण वापरत असाल तर केसांना पहिले सीरम लावावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.