Guru Purnima 2022: का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा? जाणुन घ्या पुजेची विधी

धार्मिक मान्यतेनुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनोभावे गुरुची पूजा केल्याने विशेष लाभ होतो.
Guru Purnima 2022:
Guru Purnima 2022:Dainik Gomantak

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला (Guru Purnima) अतिशय महत्व आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाभारत, पुराणकथा लिहिल्या. यावर्षी गुरुपौर्णिमा 13 जुलै म्हणजेच आज साजरी केली जाणार आहे. या दिवशी मनोभावे गुरुची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. गुरुपौर्णिमेचे महत्व शुभ मुहुर्त आणि विधि याबद्दल याबद्दल जाणुन घेउया (guru purnima what importance how celebrate)

* गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

* पौर्णिमा प्रारंभ - 13 जुलै, पहाटे 4 वाजेपासून

* पौर्णिमा समाप्ती - 14 जुलै रात्री 12 वाजून 6 मिनिटे

* गुरुपौर्णिमेचे महत्व

गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणुन ओळखली जाते. महर्षि वेद व्यास यांना वेदांचे ज्ञान होते. हिंदू धर्मात महर्षी वेद व्यास यांना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते. म्हणजेच ते अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत. धार्मिक ग्रंथांमध्ये महर्षि वेद व्यास यांना विष्णु देवाचे रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पूजा-पाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीमधील गुरु दोष आणि पितृदोष कमी होतात. तसेच नोकरी (Job) , बिझनेस आणि करियरमध्ये यश मिळते.

* गुरुपौर्णिमेला कशी करावी पूजा

गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि अंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकावे. त्यांनतर स्वच कपडे घालून देवघराची साफसफाई करावी. त्यानंतर तिथे थोडे गंगा जल टाकावे. त्यानंतर गुरुचे स्मरण करावे आणि विष्णु देवाची पूजा करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com