गुरु पौर्णिमा हिंदू महिन्याच्या आषाढाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर, अज्ञानातुन ज्ञानाकडे जो घेउन जातो त्याला गुरु म्हणतात. हा सण देशभरात पूर्ण श्रद्धा आणि भावनेने साजरा केला जातो. यावेळी गुरुपौर्णिमा 13 जुलै बुधवारी आहे. ही पौर्णिमा आषाढ पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय करू शकता. चला जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाग्य आणि नोकरीत प्रगतीसाठी कोणते विशेष उपाय करावेत. (Guru Purnima 2022 news)
* गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे करा उपाय
* गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही लक्ष्मीनारायण मंदिरात नारळ अर्पण करावा. असे मानले जाते की असे केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात.
* तुमच्या कुंडलीत गुरु दोष असल्यास गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी. तसेच गरजूंना दान करावे.
* ज्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना पिवळे धान्य दान करावे.
* ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गीता पठण करावे. असे केल्याने अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.
* ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी गुरु यंत्राची स्थापना करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी.
* नोकरीत (Job) प्रमोशन मिळण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळी मिठाई प्रसाद स्वरूपात वाटावी.
* गुरु पौर्णिमा पूजा पद्धत
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
नंतर स्वच्छ जागेवर पांढरे वस्त्र टाकून व्यासपीठ बनवावे.
यानंतर गुरु व्यासांची मूर्ती स्थापित करून त्यांना रोळी, चंदन, फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करा.
त्यानंतर 'गुरुपरामपरसिद्धयर्थं व्यासपूजं करिष्ये' या मंत्राचा जप करावा.
यासोबतच सूर्यमंत्राचा जप करावा.
गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना पिवळे वस्त्र अर्पण करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.