Green Leafy Vegetable: आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपला आहार योग्य असणे गरजेचे असते. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन, इतर खनिजे मिळाणे गरजेचे असते. अनेकवेळा असंतुलित आहारामुळे सातत्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे आपण पाहतो.
अशावेळी त्या-त्या ऋतुनुसार आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या, बाजारात मिळणाऱ्या आणि आपल्या शेतात मिळणाऱ्या रानभाज्यांचे सेवन करणे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे ठरते. आज अशाच एका रानभाजीच्या फायद्याबद्दल जाणून घेणार आहोत. ही भाजी म्हणजे घोळची भाजी आहे.
घोळच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात. महत्वाचे म्हणजे, ही लो फॅट भाजी असून यामध्ये शून्य टक्के कोलस्ट्रॉल असते.
हृदयासाठी उपयुक्त
ओमेगा-3 फॅटी अॅसीड हे हृदय निरोगी राहण्यासाठी महत्वाचे मानले जाते. हे ओमेगा-3 फॅटी अॅसीड या घोळेच्या भाजीत दिसून येते. आहारात जर घोळेच्या भाजीचा समावेश असेल तर हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण कमी होते. ब्लडप्रेशरही आटोक्यात राहते.
व्हिटॅमीन ए चा मुबलक स्त्रोत
या घोळेच्या भाजीत व्हिटॅमीन ए मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए ला अॅंटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तोंडाचा किंवा फुप्फुसाचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो.
वजन कमी करण्यासाठी
या भाजीत मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.याबरोबरच घोळची भाजी खाण्याचे अनेक फायदे असले तरीही याचे काही तोटे देखील आहेत.
घोळच्या भाजीचे अतिसेवन केल्याने मूतखडा म्हणजेच किडनीस्टोन होण्याचा धोका जास्त असतो. कारण यामध्ये Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते. याबरोबरच, जर ही भाजी शिजवून खाल्ली तर यातील हे ऑक्सालिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.