गोव्यातील गोपाळ कुडासकर एक प्रतिभावंत शिल्पकार

गोपाळ ‘गोवा काॅलेज ऑफ फाईन आर्ट’ (Goa Collage Of fine Art) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि अर्थात तो गोव्याचा (Goa) एक उत्कृष्ट शिल्पकार आहेच.
गोव्यातील गोपाळ कुडासकर एक प्रतिभावंत शिल्पकार

गोव्यातील गोपाळ कुडासकर एक प्रतिभावंत शिल्पकार

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मातीच्या वस्तूंनी समृद्ध असलेल्या डिचोली (Bicholim) ह्या गोव्यातल्या (Goa) टेराकोटा शहरातला गोपाळ कुडासकर हा एक प्रतिभावंत शिल्पकार आहे. ‘स्पेसेस अ‍ॅन्ड डायमेंशन्स’ या कला प्रदर्शनात गोपाळच्या, लाकूड, सिरॅमिक, कांस्य, स्टोन फायबरग्लास, टेराकोटा अशा विविध माध्यमातल्या आणि उत्कृष्ट फिनिशच्या 13 शिल्पांची मांडणी केलेली आहे.

ब्राँझमध्ये बनलेल्या त्याच्या ‘सर्व्हिंग पॉट’ (Serving Pot) या कलाकृतीला अतिशय हळुवार परंतु स्पष्टपणे ध्यानस्थ आणि अतिवास्तववादी असे परिमाण आहे. काळ्या दगडात कोरलेल्या ‘गुरुत्वाकर्षण’ या कलाकृतीत दोन चेहरे दोन विरुद्ध बाजूला सरकत आहेत.

फायबरग्लास (Fiberglass) आणि लोखंड यापासून बनवलेले ‘एंजेल’, दर्शकाला त्याच्यासोबत सेल्फी काढण्यास प्रवृत्त करते कारण त्यामुळे दर्शकाला स्वत:ला पंख असल्याचा भ्रम निर्माण होतो. परिपूर्णतेची भावना आणि विविध मूड आणि माध्यमांचे एकत्रीकरण यातच गोपाळ शिल्पांचे सौंदर्य दडलेले आहे. सध्या गोपाळ ‘गोवा काॅलेज ऑफ फाईन आर्ट’ (Goa Collage Of fine Art) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि अर्थात तो गोव्याचा (Goa) एक उत्कृष्ट शिल्पकार आहेच.

<div class="paragraphs"><p>गोव्यातील गोपाळ कुडासकर एक प्रतिभावंत शिल्पकार</p></div>
Goa Christmas Special: नाताळामधील स्वादिष्ट फराळ

गोपाळ म्हणतो, “मनामध्ये भावतरंग व्यक्त करण्यासाठी जागृत अवस्थेतची गरज असते. मग ते भावतरंग विशिष्ट रूपाचे, अकाराचे, आशयाचे असले तरी चालता. ज्या सजीव व निर्जीव वस्तू आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत त्यांचं काय? याच संकल्पनेवर विचार करून शिल्प माध्यमातून कलाकृती घडवण्याचा प्रयत्न मी केला आहे. एक निवडक आकृती घेऊन मग ती सजीव असो वा निर्जीव त्याला दुसऱ्या शारीरिक व मानसिक आकृतीशी जोडून एक वेगळी आकृती घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. मनामध्ये जेअंतर्मुख आकार आहेत त्यानुरूप त्याना बाह्य स्वरूपात उतरवण्यासाठी कलाकार (Artist) वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतो. कोणी चित्रकला, कोणी शिल्पकला, कोणी साहित्य अशा माध्यमातून अभिव्यक्त होतात. मी माझ्या सृजन क्षमतेला शिल्पकलेद्वारा आकार देण्याचा प्रयत्न करतो.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com