Google चे नवे फीचर, पासवर्डशिवाय कोणत्याही वेबसाइट, Appवर करू शकता लॉगिन

पासवर्ड पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बनवण्यात आला असल्याचं गुगलने म्हटलं आहे.
Google
GoogleDainik Gomantak
Published on
Updated on

गुगल (Google) आपल्या अँड्राईड (Android) आणि क्रोम (Chrome) वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर घेऊन येत आहे. या फीचरचा वापर करून अँड्राईड आणि क्रोममध्ये पिन शिवाय लॉगिन करता येणं शक्य होणार आहे. या फीचरच्या मदतीने Google Chrome आणि Android डिव्हाइसेसमध्ये पिन शिवाय बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी) लॉगिन करता येईल. विशेष म्हणजे सर्वप्रकारच्या वेबसाइट आणि अॅपसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

Google
Watch Video: अरे हा तर भारताचा स्पाइडरमॅन! ट्रेनमधला व्हिडिओ झाला व्हायरल

गुगलच्या या फीचरचा वापर करून फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटचा वापर करून फेसबुकवर (Facebook) लॉग इन करता येऊ शकते. 'पासकी' (Passkey) असे या फीचरचे नाव आहे. हे फीचर वापरणे पासवर्ड इतकेच सुरक्षित असेल, असे गुगलने म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्ट, ऍपल आणि गुगलने मे महिन्यात कॉमन पासवर्डलेस साइनइन बाबत घोषणा केली. पासकी (Passkey) वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टियम (W3C) आणि FIDO अलायन्सने या कंपन्यांच्या सहकार्याने तयार केला आहे. सध्या हे फीचर पूर्णपणे विकसित नसले तरी लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

Google
Just Marriage Tips: लग्नानंतर नात्यातील टिकवून ठेवा गोडवा

Google ची ही नवीन पासवर्ड पद्धतीमुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित होईल तसेच, प्रत्येक पासवर्ड लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. तसेच, जुन्या फोनवरून नवीन फोनमध्ये पासवर्ड सहजपणे ट्रान्सफर करता येईल. पासवर्ड पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बनवण्यात आला असल्याचं गुगलने म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com