Google Chrome: गूगल क्रोम यूजर्संना आता मिळणार अधिक सुरक्षा, 'हे' फीचर होणार अपडेट

गूगल आपला क्रोम वेब ब्राउझर सुधारण्यासाठी सतत काम करत आहे.
Google Chrome
Google ChromeDainik Gomantak
Published on
Updated on

Google Chrome: गूगल आपला क्रोम वेब ब्राउझर सुधारण्यासाठी सतत काम करत आहे. कंपनीने आता म्हटले आहे की ते Google Chrome ची सेफ्टी चेक फिचरवर काम करत आहे.नवीन अपडेटनंतर हे फीचर बॅकग्राउंडमध्ये चालत राहील आणि त्यात सुरक्षा त्रुटी आढळल्यास ते यूडर्संना त्याबद्दल माहिती देईल. आतापर्यंत युजर्सना हे फीचर अॅक्टिव्हेट करावे लागत होते. आता गुगल हा त्रास संपवत आहे.

या फिचरचा फायदा काय?

जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर क्रोममध्ये काम करत असाल आणि एखाद्याला तुमचा पासवर्ड सापडला तर तो तुम्हाला लगेच सावध करेल. तसेच, जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही वेबसाइटला भेट दिली नाही, तर ती त्याला दिलेली परवानगी आपोआप रद्द करेल. याशिवाय गुगल मेमरी सेव्हर फीचर देखील अपडेट करत आहे. या अंतर्गत वापरकर्त्यांना टॅब बंद करणे किंवा उघडे ठेवण्याचे नियंत्रण मिळेल.

यूजर्सना आणखी एक उत्तम फीचर मिळेल

Google Chrome यूजर्संसाठी आणखी एक फायदेशीर फिचरवर काम करत आहे. जे येत्या काही दिवसांत रोलआउट सुरू होईल. या अंतर्गत यूजर्सना डेस्कटॉपवर टॅब ग्रुप सेव्ह करण्याची सुविधा मिळणार आहे. याचा फायदा असा होईल की जर त्यांनी ते इतर कोणत्याही उपकरणावरून अॅक्सेस केले तर त्यांना नवीन टॅब उघडण्याची गरज भासणार नाही आणि ते आधी डेस्कटॉपवर जिथे सोडले होते तेथून काम सुरू करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com