Goan Food: गोव्यातील 'या' 10 हेल्दी अँड टेस्टी पदार्थांचा आस्वाद तुम्ही घेतलाय का?

गोव्याला जाण्याचा विचार करत असाल किंवा सध्या तुम्ही गोव्यात असाल तर तुम्ही या टेस्टी आणि हेल्दी पदार्थांची चव चाखलीच पाहिजे.
Goan Food
Goan FoodDainik Gomantak
Published on
Updated on

10 Must try Goan food: गोवा म्हटले की डोळ्यासमोर येतात सुमद्रकिनारे आणि तेथील गोवन पदार्थ. गोव्यातील हे सौंदर्य अनुभवायला आणि गोव्यातील पदार्थांची चव चाखायला जगभरातील पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येत असतात. तुम्हीही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल किंवा सध्या गोव्यात असाल तर या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांची चव नक्की चाखा.

1) सन्ना (Sanna)

तुम्ही गोव्यात आल्यावर सकाळच्या नाश्तात हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता. वाफवलेल्या भाताच्या पेस्ट्रीची प्लेट "सन्ना" म्हणून ओळखली जाते. हा पदार्थ प्रथिने आणि कर्बोदक या दोन्हीचा चांगला स्रोत आहे. यामध्ये आंबवलेला तांदूळ आणि नारळाचे दूध असते.

2) पोई (poee)

या यादिमध्ये पोई हा पदार्थ दुसऱ्या नंबरवर आहे. हा एक प्रकारचा पारंपारिक गोवा ब्रेड आहे. जो गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. हा ब्रेड फायबरचा एक चांगला स्रोत आहे. त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.

3) फिश करी (Fish Curry)

गोव्यात आल्यावर फिश करीचा नक्की आस्वाद घ्यावा. अनेक पर्यटक खास करून फिश करीवर ताव मारण्यासाठीच येतात. ताजे मासे,नारळाचे दुध आणि मसाल्यापासून बनवलेला हा पारंपारिक पदार्थ आहे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.

4) कोळंबी बलचो (Shrimp Balcho)

गोव्यात तुम्ही कोळंबी बलचोचा आस्वाद घेऊ शकता. चवदार आणि खमंग मसाल्यांनी बनवलेला हा पदार्थ प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असतो.

5) Vegetable Xacuti

ही एक पोर्तुगिज डिश आहे. तुम्ही शाकाहारी असाल तर हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल. विविध भाज्या, नारळाचे दुध आणि मसाल्यांपासून बनवलेली स्वादिष्ट करी आहे. ही डीश आरोग्यदायी असुन यामध्ये अनेक पोषक घटक, खनिजं असतात.

6) कोकम ज्यूस (Kokum Juice)

कोकम झाडाच्या फळाचा वापर ताजे पेय बनवण्यासाठी केला जातो. यालाच कोकम ज्यूस म्हणतात. हा ज्युस अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. गोव्यात उन्हाळ्यात थंडावा मिळावा यासाठी कोकम ज्युस आवडीने पिला जातो.

7) नारळ पाणी (Coconut water)

गोव्यात गेल्यावर हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. यामध्ये कॅलरी कमी असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते. यामुळे गोव्यात फिरतांना तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

8) किंगफिश (KingFish)

किंगफिश हा गोव्यातील लोकप्रिय सीफूड डिश आहे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जर तुम्हाला ओमेगा-३ समृद्ध काहीतरी खायचे असेल तर गोव्याच्या माशाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

9) प्रॉन्स (Prawns)

गोव्यात तुम्ही सीफुडचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही गोव्यात आल्यावर प्रॉन्स खाऊ शकता. यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात

10) भाज्या

गोव्यात फक्त मासांहारच मिळतो हा खुप मोठा गैरसमज आहे. कारण गोव्यात ताज्या भाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली आणि पालक या भाज्या सर्वात जास्त खाल्ल्या जातात. भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. गोव्यात तुम्ही अनेक रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकता. गोव्यात तुम्हाला पारंपारिक गोवन पदार्थ आणि शाकाहारी पदार्थांचा देखील आस्वाद घेता येईल.

  • गोव्याच्या हेल्दी पदार्थांचे सेवन करायचे असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात

  1. प्रोसेस्ड पदार्थ आणि साखरयुक्त पेये टाळावे.

  2. फ्रेश पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

  3. लाल मांस आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे.

  4. गोव्यात आल्यावर दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.

वरील गोष्टी तुम्हाला आरोग्याशी तडजोड न करता गोव्यातील पदार्थांचा आस्वाद घेण्यास मदत करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com