Goa Trip: 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा २६ जानेवारीला शुक्रवार आला आहे. यामुळे तुम्ही शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा लाँग विकेंडचा आनंद घेऊ शकता. तुम्ही वीकेंड ट्रीपचे प्लॅनिंग करत असाल तर गोव्याला भेट देऊ शकता. गोवा म्हटंल की डोळ्यासमोर लगेच बीच, चर्च आणि नाइट लाइफ येते. पण गोव्यात फक्त एवढेच नाही तर असे अनेक ठिकाण आहेत, जिथे तुम्ही भेट देऊन यंदाचा प्रजासत्ताक दिन अविस्मरणीय बनवू शकता. चला तर मग जाणून गोव्यातील निसर्गरम्य ठिकाणे कोणती आहेत.
Ancestral Goa Museum
गोव्यातील या अनोख्या संग्रहालय भेट देऊ शकता. या संग्रहालयात तुम्हाला गोव्यातील जुने मार्ग, गोवन चालीरिती पाहायला मिळेल. तसेच तुम्ही येथे रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर, खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेऊ शकता. हे संग्रहालय सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुले असते. गोव्याचे हे एक अनोखे संग्रहालय पणजीपासून 30 किमी अंतरावर आहे.
स्थळ: Loutolim, Savior of the World Church, Loutolim, Goa
वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6
Aguada Fort
आग्वाद किल्ला सतराव्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आणि दीपगृह आहे. हा किल्ला सिंक्वेरिम बिचवर वसलेले आहे. गोव्यात आल्यावर या किल्ल्याला नक्की भेट द्या. हा गोव्यातील एक भव्य प्रेभणीय स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला पणजीपासून 16 किमी अंतरावर आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे लोकांसाठी खुले असते.
स्थळ: Fort Aguada Rd, Aguada Fort Area, Candolim
वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6
Dudhsagar Falls
गोव्यातील दूधसागर धबधबा पाहण्यासाठी देश-विदेशतील पर्यटक येतात. हा धबधबा मांडवी नदीवर वसलेले आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी आणि सरासरी रूंदी ३० मी आहे. तुम्ही येथे सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकणार नाही.
स्थळ: Sonaulim, Goa
Anjuna Flea Market
गोव्यात शॉपिंग करण्यासाठी अंजुना फ्ली मार्केटला जाऊ शकता. हे फ्ली मार्केट बुधवारी सुरू असते. तुम्ही येथे इलेक्ट्रॉनिक वस्तुंपासून ते कपडे आणि फळं खरेदी करू शकता. विदेशातून आलेल्या पर्यटकांसह अनेक लोकांचे हे आवडते ठिकाण आहे. हे मार्केट पणजीपासून 22 किमी अंतरावर आहे.
स्थळ: HPGR+FM4, Monteiro Vaddo, Anjuna, Goa
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.