रांगोळी शास्वत राहील

रांगोळी ही खरे तर एक अभिजात भारतीय कला आहे.
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

रोज गृहिणीच्या बोटांतून उंबरठ्यावर रेखाटली जाणारी किंवा सणासुदीच्या (Festival) दिवसात सप्तरंग परिधान करून मिरवणारी रांगोळी ही खरे तर एक अभिजात भारतीय कला आहे. पण तिचे आयुष्य अवघ्याच दिवसापुरते मर्यादित असल्याने ही कला अलीकडच्या काळापर्यंत ‘व्यवसाया’ चा भाग बनू शकली नव्हती. पण आता रांगोळीने (Rangoli) अलीकडे कॉर्पोरेट क्षेत्रातसुद्धा प्रवेश केला आहे. मोठमोठी आस्थापने त्यांच्या कार्यक्रमाच्या सजावटीत रांगोळीचा समावेश आता अगत्याने करतात. असे असले तरी ‘टिकाऊ’ चित्रकारितेला आज जे स्थान आहे ते रांगोळीला अजून लाभलेले नाही.

या गोष्टीचा विचार करून आकाश नाईक या रांगोळी कलाकाराने (खरंतर त्याला ‘रांगोळी कलाकार’ म्हणणे ही त्याची फार मर्यादित ओळख होईल) रांगोळी इतर चित्रांसारखीच दीर्घकाळ टिकावी यासाठी स्वतःचे तंत्र विकसित केले आहे. रंगांना चिकटवून ठेवणारे विशिष्ट द्रव्य वापरून व रांगोळी-रंगांच्या अनेक स्तरांवर काम करून तो ही टिकणारी रांगोळीचित्रे तयार करतो. आकाशचे हे तंत्र यशस्वी ठरले व त्याचा प्रसार झाला तर ‘रांगोळी’ हे चित्रकलेतले आणखीन एक प्रभावी माध्यम ठरू शकेल. कवळे येथील देवी शांतादुर्गेचे (Shantadurga) रांगोळी-चित्र आपल्या तंत्राने तयार करून त्याने ते देवस्थानाला भेट दिले आहे. अशी काही अन्य रांगोळी चित्रेही त्याने बनवलेली आहेत व ती इतर चित्रांप्रमाणेच फ्रेम करून ठेवल्याने दीर्घकाळ टिकतील हे तो आत्मविश्वासाने सांगतो.

Goa
Piles वर 7 उत्तम घरगुती उपाय

आकाश नाईक ‘गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट’चा (Goa Collège Of Fine विद्यार्थी. त्याचा भाऊ उमेश छान रांगोळी घालायचा. त्याच्या प्रभावाने प्रेरित होऊन आकाशनेदेखील रांगोळी घालायला सुरुवात केली. अकरावीत असताना त्याने आपली पहिली रांगोळी (पोर्ट्रेट) घातली. त्याच्या या पहिल्याच प्रयत्नाला पहिले बक्षीस मिळाले आणि त्याचा रांगोळी कलेतला प्रवास सुरू झाला. कलेची त्याला आवड होतीच त्यामुळे कलेचे औपचारिक शिक्षण घेणेही क्रमप्राप्तच होते.

आकाश रांगोळीकलेचे वर्गही घेतो. फोंडा आणि डिचोली येथे त्याचे वर्ग चालतात. अगदी अलीकडच्या काळात सुरू करून देखील आतापर्यंत किमान पन्नास विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे रांगोळीकला शिकून घेतली आहे.

Goa
बियरच्या बाटल्यांची डोकेदुखी: हा शत्रू आवरेल का?

आकाश 25 चौरस मीटरची भव्य रांगोळी घालतोच पण लहान चमच्यात मध ओतून त्यात त्याने घातलेल्या (साईबाबांचे पोर्ट्रेट) अतिशय छोट्या रांगोळीचा, आकाराने सर्वात लहान रांगोळी म्हणून 2021 वर्षी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये समावेशही झाला आहे. रांगोळीव्यतिरिक्त आकाश इतर माध्यमातही चित्रे रंगवतो.

रांगोळीवर त्याचे विशेष प्रेम

आर्ट कॉलेजमध्ये ‘शिल्पकला’ हा त्याचा विशेष विषय होता. त्यामुळे केवळ ‘रांगोळी आर्टिस्ट’ हा शिक्का त्याच्यावर लादणे निश्चितच योग्य नाही. अर्थात, रांगोळीवर (Rangoli) त्याचे विशेष प्रेम आहेच आणि याचमुळे रांगोळी शाश्वत कशी राहील या संबंधात संशोधन करून त्याने ते तंत्रही विकसित केले. भारतीय संस्कृतीत मानाचे पान राखून असलेल्या रांगोळीला असा वेगळा आयाम मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न नक्कीच ऐतिहासिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com