बियरच्या बाटल्यांची डोकेदुखी: हा शत्रू आवरेल का?

गोव्यात (Goa) सरासरी दिवसाला 40000 बिअरच्या बाटल्या फस्त केल्या जातात असा अंदाज आहे.
Goa |Environment
Goa |Environment Dainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळा सुरू होताच गोव्यात बियरची मागणी अगदी शिगेला जाऊन पोहोचते. गोव्यात एरवीही तशी बियरला बाजारात मंदी आली आहे असे सहसा होत नाही. पिताना गळ्याला थंडगार दिलासा देणाऱ्या बियरच्या बाटल्या मात्र नंतर प्रचंड डोकेदुखी निर्माण करणाऱ्या ठरतात. गोव्यात (Goa) सरासरी दिवसाला 40000 बिअरच्या बाटल्या फस्त केल्या जातात असा अंदाज आहे. (Goa Beach environment News)

यानंतर या रिकाम्या बाटल्यांचे काय होते? या प्रश्नाच्या उत्तरातच गोव्याचे दुर्दैव लपलेले आहे. या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही ठोस व्यवस्था आजपर्यंत राज्याजवळ नाही. त्यामुळे या बाटल्या किनाऱ्यावर, डोंगर-माळावरच्या उघड्या जागेत, शेतात, रस्त्याच्या कडेला इतस्ततः पसरून असलेल्या दिसतात.

ज्याप्रमाणे प्लास्टिक पर्यावरणाला (Environment) धोका निर्माण करते त्याचप्रमाणे काचही धोका निर्माण करतेच. समुद्राच्या तळाशी असलेली किंवा जमिनीत पुरली गेलेली काच ही तिथल्या जागेत फार दीर्घकाळपर्यंत विघटित होत नाही. त्यामुळे काचही एकापरीने पर्यावरणाला प्रदूषित करणारेच माध्यम ठरते. रिकाम्या काचेच्या बाटल्या स्वीकारायलाही भंगारवाले सध्या तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या बाटल्यांचे करावे काय हा मोठा प्रश्न गोव्याच्या प्रशासनासमोर, इतर प्रश्नांबरोबरच उभा आहे.

Goa |Environment
Piles वर 7 उत्तम घरगुती उपाय

पण अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या उन्हात थंडगार बिअरचा घोट जसा गळ्यातून पोटापर्यंत जशी सुखाची एक रेघ तयार करतो तशीच सुख देणारी एक बातमी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी दिली आहे. ती म्हणजे इथे तिथे विखरून पडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विक्रेत्यांकडे परत सुपूर्द करायची योजना आखण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. गोव्याच्या पर्यटन खात्यामार्फत ही योजना चालीला लागणार आहे.

प्लास्टिकप्रमाणेच काचेच्या बाटल्याही गोव्याच्या (Goa) पर्यावरणाच्या आज शत्रू बनून आहेत. पर्यटनखात्याची (Tourist) ही योजना चालीस लागल्यास निदान एका शत्रूला आवाक्यात आणल्याचे समाधान लाभणे ही बाबदेखील समाधानाची असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com