Tips For Deep Sleep: गाढ झोपेसाठी रोज 'या' 6 गोष्टी करा; रात्रीची निवांत आणि गाढ झोप जरुर अनुभवाल

Tips For Deep Sleep : हल्लीच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या परिस्थितीत प्रत्येकाला सात तासांची अशी झोप लागेलच अस नाही.
Tips For Deep Sleep
Tips For Deep SleepDainik Gomantak
Published on
Updated on

Tips For Deep Sleep: दिवसभर प्रत्येकजण आपापल्या परीने उदरनिर्वाहासाठी धावपळ करत असतो. मेहनत करत असतो. शारीरिक, मानसिक श्रम केल्यावर रात्री निवांत आणि गाढ झोप यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

मात्र हल्लीच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या परिस्थितीत प्रत्येकाला सात तासांची अशी झोप लागेलच अस नाही. मग अशा झोपेकरिता येण्याकरिता डॉक्टरकडे फेऱ्या सुरु होतात.

पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत की, ज्यामुळे तुम्हाला रोजच शांत, निवांत आणि गाढ झोप लागणार आहे.

1) ध्यानधारण करणे:-

झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान. रोज किमान 10 मिनिटे स्वस्थ बसून ध्यान केल्यास काही दिवसातच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल. फक्त यात सातत्य हवेच

2) मंत्रोच्चार:-

दिवसातून किमान एकदा तरी ओंकाराचे गुंजन करावे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर करु शकतो, थोपवू शकतो.

Tips For Deep Sleep
Symptoms Of Cancer: 'ही' लक्षणं म्हणजे गंभीर आजाराची चाहूल; बिलकुल दुर्लक्ष करु नका

3) योगासने करणे:-

नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो.

4) मसाज करणे:-

झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात. ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते.

5) मॅग्नेशियम

ज्या आहारातून आपल्याला अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जातील अशाप्रकारचा आहार घ्यावा. ह्यापैकी मॅग्नेशियम ह्या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते. त्यामुळे रोज सकाळी गुल आणि मोड आलेले शेंगदाणे एकत्र करून खावेत

6) आवडते शांत संगीत ऐकणे:-

संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करण्याची क्षमता असते. संगीतामुळे आपले मन शांत होते. त्यामुळे साहाजिकच आपल्याला झोप यायला सुरुवात होते.

झोप नीट येत नसेल किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

(ही सर्व माहिती विविध स्रोतांमधून मिळवण्यात आली असून गोमंतक याबाबत कोणतीही ग्वाही देत नाही. सविस्तर माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com