Symptoms Of Cancer: 'ही' लक्षणं म्हणजे गंभीर आजाराची चाहूल; बिलकुल दुर्लक्ष करु नका

Symptoms of Cancer: काही आजार हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचल्यावर लक्षणे दाखवू लागतात.
Symptoms of cancer
Symptoms of cancerDainik Gomantak

Symptoms of Cancer: सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवणं फार महत्वाचे आहे, कारण काही आजार हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचल्यावर लक्षणे दाखवू लागतात. त्यामुळे कित्येकदा रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होतं.

अशातील एक महत्वाचा आणि गंभीर आजार म्हणजे कर्करोग वा कॅन्सर. हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो.

आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.

मात्र आपण जर काळजी घेतली तर यातून आपली नक्कीच सुटका होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शरीरातील 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका.

  • वजन कमी होणे:- जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

  • शरीरात सूज किंवा गाठ:- शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटीपोटात, स्तनात किंवा अंडकोषात गाठ कर्करोगामुळं असू शकतं.

Symptoms of cancer
Goa Crime: नवजात अर्भकांना बेवारस सोडण्याच्या घटनांमध्ये मुलींची संख्या जास्त; धक्कादायक आकडेवारी समोर
  • खोकला:- सतत खोकला हेदेखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

  • लघवीमध्ये रक्त दिसणं:- लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रात रक्त येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

  • खाताना अडचण:- अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रास होणं, खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं हीदेखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात. अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या बाबतीत हे होऊ शकतं.

  • रात्री घाम येणं:- रात्री घाम येणं हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचं धोक्याचं लक्षण असू शकतं. हे बहुतेक लिम्फोमाच्या बाबतीत घडतं. या प्रकारचा कर्करोग लिम्फॅटिक प्रणालीमध्ये होतो. लिम्फॅटिक सिस्टीम हे संपूर्ण शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्या आणि ग्रंथींचं जाळं असून कर्करोगामुळं यांत अडचणी निर्माण होतात.

वरील एखादा त्रास होतोय, म्हणजे कर्करोग झाला अस नाही, बऱ्याच वेळी आपल्याला छोटीशी समस्या ही असू शकते, म्हणून डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्याशिवाय कुठलाही विचार किंवा उपाय करू नये.

(ही सर्व माहिती विविध स्रोतांमधून मिळवण्यात आली असून गोमंतक याबाबत कोणतीही ग्वाही देत नाही. सविस्तर माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com