Goa Flea Market: पर्यटक आणि गोवेकरांचे आकर्षणाचे केंद्र

Goa Collective Bazaar: हे मार्केट गोव्याच्या (Goa) ‘नाईट लाईफ’चा एक हवाहवासा भाग बनून राहिले होते.
Goa Flea Market
Goa Flea MarketDainik Gomantak

दर शुक्रवारची रात्र चमकदार बनवणारे ‘गोवा कलेक्टिव्ह बाजार’ हे फ्ली मार्केट गेल्या शुक्रवारी आपला शेवटचा बाजार करून या मोसमापुरते बंद झालेले आहे. 100 स्टॉल, लाईव्ह म्युझिक, मुलांसाठी मनोरंजनाची वेगळी जागा आणि स्वादिष्ट पाककृती (Food) यामुळे हे फ्ली मार्केट पर्यटक (Tourist) आणि स्थानिकांचेही आकर्षणाचे केंद्र बनले होते. (Goa Flea Market News)

जगातल्या चित्रविचित्र वस्तू हुडकण्यासाठी हे मार्केट (Market) अगदी अनुरूप जागा होती. यंदाचा हा मोसम संपवताना ‘गोवा कलेक्टिव्ह बाजार’ने (Goa Collective Bazaar) काही रंगतदार कार्यक्रमांची साखळी गेल्या महिन्याच्या अखेरीस आयोजित केली होती. त्यात ‘डिस्को फिवर’ आणि ‘दि कॅटवॉक’ (फॅशन शो) असे दोन अतिशय भपकेदार सोहळे समाविष्ट होते. ‘दि कॅटवॉक’चा गवगवा गोवाभर झालेला होता. त्यामुळे हा फॅशन शो (Fashion Show) पाहण्यासाठी झालेली गर्दीही विशेष होती.

‘दि कॅटवॉक’मध्ये आठ प्रतिभावान आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर्सनी आपल्या नव्या रचना सादर केल्या. 65 देखण्या मॉडेल या फॅशन शोच्या भाग बनल्या होत्या. विशेष म्हणजे या प्रतिभावान डिझाईनरनी ठळक भारतीय रंगांची आणि वेशभूषेची प्रेरणा घेऊन आपल्या वेशभूषांची रचना केली होती. भारतीय वेशभूषेला आपल्या रचनांद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय चेहरा या फॅशन शोमधून दिला.

गेले कित्येक शुक्रवार, हे मार्केट गोव्याच्या (Goa) ‘नाईट लाईफ’चा एक हवाहवासा भाग बनून राहिले होते. तिथे प्रवेश केल्यावर तिथल्या कॉकटेल बारवरची थंडगार बियर उचलून, तिथल्या रंगीबेरंगी विश्वात हरवून जाणे ह्यात एक वेगळाच आनंद होता. पर्यटनाचा (Tourism) पुढचा मोसम सुरू होईपर्यंत हा बाजार हुरहुर लावून राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com